दोन्ही NCP एकत्र येणार का? फडणवीस म्हणाले, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असं मला करु नका
देवेंद्र फड्नाविस: राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सुरु झाली आहे. इतकचं नाही तर शरद पवार (Sharad Pawar) पुढे बोलताना म्हणाले होते की, पक्षात दोन प्रवाह आहेत, एकाला वाटते अजितसोबत (Ajit Pawar) जावे. दुसरा प्रवाह भाजपपासून दूर राहावे या मताचा आहे, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं होतं.
देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
दरम्यान, यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यावरती तुम्ही सुप्रिया सुळे किंवा शरद पवार यांना विचारा… बेगाना शादी मे अब्दुल्ला दिवाना असं मला का करता? पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला अतिशय समाधान आहे 750 जन्मोत्सवाच्या निमित्ताने दर्शन घेण्याची संधी मिळाली. वारकरी संप्रदायाची पाया ज्ञानेश्वर महाराज यांनी रचला. संताचे विचार समाजात रुजले पाहिजेत.
🕛 11.51am | 10-5-2025📍Pune
लाइव्ह | मीडिया संवाद#महाराष्ट्र #Pune https://t.co/wntsslprj7
– देवेंद्र फड्नाविस (@dev_fadnavis) 10 मे, 2025
भारत पाक युद्धावर बोलताना फडणवीस म्हणाले, पाकिस्तान हे आतंकवादी राष्ट्र आहे, मात्र आता भारत थांबणार नाही. राज्यात आम्ही बैठक घेतली सर्व आम्ही सक्षम आहोत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा मुद्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, या संदर्भात माझं कुणाशी बोलणं झालं नाही. काल सर्व पक्ष बैठकीत होते. त्यामुळे सध्या देशाचा विषय महत्त्वाचा आहे. अगोदर देश मग राज्य मग पक्ष आणि नंतर कुटुंब त्यामुळे सध्या माझी प्रायोरिटी देशाला आहे. आधी लग्न कोंढाण्याच.. अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.