Devendra Fadnavis gave a strong response after Abu Azmi’s controversial statement regarding Wari
वारीसंदर्भात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अबू आझमी यांच्या वक्तव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
नागपूर : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीने दोन दिवस पुण्यात मुक्काम केल्यानंतर आज (22 जून) सकाळी दोन्ही पालख्या आपल्या पुढील मुक्कामासाठी रवाना झाल्या. पुणे ते सासवड असा 32 किलोमीटरचा मार्ग वारकरी पार करतील. त्यानंतर सासवडला मुक्काम करणार आहेत. मात्र वारीसंदर्भात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अबू आझमी यांच्या वक्तव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. (Devendra Fadnavis gave a strong response after Abu Azmi’s controversial statement regarding Wari)
नागपुरातील मुख्यमंत्री सचिवालयात असलेल्या हैदराबाद हाऊसमध्ये आज कुंभमेळ्याच्या अनुषंगाने रस्ते विकासावर बैठक झाली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अबू आझमी यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अबू आझमी यांना वादग्रस्त विधानं करण्याचा शौक आहे. वादग्रस्त विधान केले की प्रसिद्धी मिळते, असे त्यांना वाटते. परंतु अबू आझमी यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नसल्यामुळे त्यांच्या फालतू वक्तव्याला मी उत्तर देणार नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी जास्त बोलणं टाळलं.
हेही वाचा – Prakash Ambedkar : माझ्या सर्व शंका आज प्रत्यक्षात आल्या; निवडणूक आयोगाच्या त्या निर्णयावर आंबेडकरांची टीका
काय म्हणाले होते अबू आझमी?
माध्यमांशी संवाद साधताना अबू आझमी म्हणाले होते की, आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात? याची तक्रार केलेली नाही. पण ज्यावेळी मशीद पूर्ण भरते, तेव्हा काही मशिदीतील लोकं 5 ते 10 मिनिटं रस्त्यावर नमाज पठण करतात. अशावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात रस्त्यावर नमाज पठण केलं तर पासपोर्ट रद्द करू. तर दुसरीकडे मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितलं की, लवकर जा अन्यथा पालख्यामुळे रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, तरीही आम्ही कधी तक्रार केली नाही. पण नमाजसाठी तक्रार होते. याचा अर्थ जाणीवपूर्वक काही लोक मुस्लिम लोकांच्या बाबतीत अशा गोष्टी करत आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य अबू आझमी यांनी केले आहे.
हेही वाचा – Accident : माजी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी; कारखाली चिरडून एकाचा मृत्यू
Comments are closed.