Devendra fadnavis give deputy chief minister post after tears came my eyes said chandrashekhar bawankule-ssa97
Chandrashekhar bawankule On Assembly election : विधानसभा निवडणूक आपण ग्रामपंचायतीप्रमाणे लढलो. लोकसभेला खोटा प्रचार विरोधकांनी केला, असा आरोप बावनकुळेंनी केला.
2019 मध्ये आपल्यासोबत बेईमानी झाली होती. देवेंद्र फडणवीस यांना चक्रव्यूहात अडकविण्याचा प्रयत्न होता. पण, आपलं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले. तेव्हा, आपल्या डोळ्यात पाणी आलं होते, असं विधान महसूलमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
देवेंद्र फडणवीस हे आधुनिक अभिमन्यू आहेत, असंही बावनकुळेंनी सांगितलं आहे. शिर्डीत भाजपचे महाअधिवेशन पार पडत आहे. तिथे बावनकुळे बोलत होते.
– Advertisement –
हेही वाचा : तुम्ही धनंजय मुंडेंना पाठीशी घालताय का? प्रश्न विचारताच अजितदादा भडकले; म्हणाले, “अरे बाळा…”
बावनकुळे म्हणाले, “मी कोल्हापुरात म्हणालेलो की, महायुतीचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होतील. कार्यकर्ते कामाला लागले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यांचा शपथविधी वानखेडे स्टेडियमवर नाही, मात्र आझाद मैदानावर झाला. आणि पुन्हा एकदा डोळ्यात आनंदाश्रू आले.”
– Advertisement –
“श्रद्धा आणि सबुरी महत्त्वाची आहे. मतदारांनी आपल्याला भरघोस मतदान केले. पदाधिकाऱ्यांनी जिवाचं रान केले, त्यामुळे आपल्याला यश मिळाले. त्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी हे अधिवेशन आहे. कार्यकर्त्यांनी मदत केल्यामुळे मी अध्यक्ष म्हणून चांगलं काम करू शकलो,” असं बावनकुळेंनी सांगितलं.
“देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर विश्वास होता. विधानसभा निवडणूक आपण ग्रामपंचायतीप्रमाणे लढलो. लोकसभेला खोटा प्रचार विरोधकांनी केला. त्याचा आपल्याला फटका बसला. त्यातून आपण खचलो नाही, तर लढलो. विधानसभा निवडणूक आपण जिंकणार आहोत, असं अमित शहांना सांगून कार्यकर्त्यांना कामा लागा, असा आदेश दिला होता,” असं बावनकुळेंनी म्हटलं.
हेही वाचा : परळीत राखेच्या टिप्परनं सरपंचाला चिरडलं, सुरेश धसांनी थेट मालकाचं नाव सांगत केला मोठा आरोप
Comments are closed.