पेट्रोल-डिझेलसाठी ग्रामीण भागात रांगा; मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, काहीतरी गडबड!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पाच राज्यातील विधानसभा निवडणुका संपताच इंधन दरवाढीचा सपाटा सुरू झाला. गेल्या आठ दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर तीन वेळा वाढले असून राज्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती बिकट होत चालली आहे. इंधन टंचाईच्या भीतीने ग्रामीण भागात पेट्रोल पंपावर ड्रम, कॅन, बाटल्या घेऊन रांगा लागल्या आहेत. शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर गर्दी करत असल्याचे दिसून आले असून यातून वादाचीही ठिणगी पडत आहे. काही ठिकाणी शेतकरी आणि पेट्रोल पंपावरील कर्मचारी यांच्यात शाब्दिक वाद आणि हाणामारी झाल्याचेही दिसून आले. डिझेल मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला असताना आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून काहीतरी गडबड असल्याची शक्यता वर्तवली आहे. ते शिर्डी येथे माध्यमांशी बोलत होते.

Comments are closed.