Devendra Fadnavis’ reaction after Supreme Court reprimands Rahul Gandhi for making objectionable remarks about Savarkar


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना फटकारले आहे. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना फटकारले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या लोकांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले आणि तुम्ही त्यांच्याबाबत असे वागत आहात! भविष्यात कधीही अशा प्रकारच्या टिप्पण्या करू नका, अन्यथा न्यायालय स्वतःहून त्याची दखल घेऊ शकते, असा इशाराही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. (Devendra Fadnavis’ reaction after Supreme Court reprimands Rahul Gandhi for making objectionable remarks about Savarkar)

माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्वातंत्रवीर सावरकरांचा सातत्याने अपमान करणाऱ्या राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयानेच चपराक लगावली आहे. आता रोज संविधान हातामध्ये घेऊन फिरणारे राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवणार का? हा माझा प्रश्न आहे. पण यापुढे स्वातंत्र संग्राम सैनिकांचा अपमान राहुल गांधी करणार नाहीत, अशी मला अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मी आभार मानतो, कारण त्यांनी राहुल गांधींना त्यांची जागा दाखवली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या नायकांना राहुल गांधी सातत्याने अपमानित करत होते. पण आता ते अपमानित करणार नाहीत, अशी माझी अपेक्षा आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना लगावला.

हेही वाचा – Uddhav Thackeray : …त्या सगळ्यांपासून देशाला खरा धोका, ठाकरेंकडून सावधगिरीचा इशारा

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?

काँग्रेस नेते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी ‘माफी वीर’ अशी टिप्पणी केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. स्वातंत्र्यसैनिकांची अशी चेष्टा करू नका. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या लोकांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले आणि तुम्ही त्यांच्याबाबत असे वागत आहात. महात्मा गांधी यांनीही ब्रिटिशांशी संवाद साधताना स्वतःसाठी “तुमचा विश्वासू सेवक” या शब्दांचा वापर केला होता, हे राहुल गांधी यांना माहीत आहे का? असा प्रश्न न्यायालयाने राहुल गांधी यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांना विचारला. तसेच राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबद्दल केलेले विधान बेजबाबदार होते. त्यांनी हे बोलायला नको होते. त्यामुळे भविष्यात राहुल गांधींनी कधीही अशा प्रकारच्या टिप्पण्या करू नये, अन्यथा न्यायालय स्वतःहून त्याची दखल घेऊ शकते, असा इशाराही सर्वोच्च न्यायालयाने दिला.

हेही वाचा – Pahalgam Terror Attack : मग क्रिकेटचे काय करणार? उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल



Source link

Comments are closed.