Devendra Fadnavis reaction to Sharad Pawar criticism of Saif Ali Khan rrp
आधी सलमान खानच्या वांद्रेतील घरावर गोळीबार, त्यानंतर नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या आणि आता बॉलीवूडचा प्रसिद्ध अधिनेता सैफ अली खान यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शऱद पवार यांनी मुंबईतील कायदा व सुव्यस्था ढासळण्याचे हे लक्षण असल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. याप्रकरणी आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. कारण याआधी वांद्रे परिसरात सलमान खानच्या घरावर गोळीबार आणि त्यानंतर राष्ट्रादी काँग्रसेचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली होती. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शऱद पवार यांनी मुंबईतील कायदा व सुव्यस्था ढासळण्याचे हे लक्षण असल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. याप्रकरणी आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis reaction to Sharad Pawar criticism of Saif Ali Khan)
देवेंद्र फडणवीस यांनी आज अभिनेत्री कंगणा रणौत हिच्या इमर्जन्सी या चित्रपटाच्या स्पेशल शोला हजेरी लावली होती. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांना सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, पोलिसांनी त्यासंदर्भातली सर्व माहिती आपल्याला दिलेली आहे. यामागे चोरांचा कोणता हेतू असू शकतो, हल्लेखोर कसे आले हे देखील पोलिसांनी सांगितलं आहे. त्यामुळे सध्या याप्रकरणी कारवाई सुरू आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
हेही वाचा – Nana Patole : सैफ अली खानवरचा हल्ला म्हणजे कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा, नाना पटोलेंची टीका
मुंबई शहर सुरस्थित राहीलं नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे, असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशातल्या मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे. कधी काही घटना घडतात. त्या घटनांना गांभीर्याने घेतलं पाहिजे. पण केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे, असं म्हणणं हे योग्य होणार नाही. कारण यामुळे मुंबईची प्रतिमा खराब होत आहे. पण मुंबई अधिक सुरक्षित राहिली पाहिजे, यादृष्टीने सरकार निश्चित प्रयत्न करेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
काय म्हणाले शरद पवार?
दरम्यान, सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरी रात्री 2.30 वाजता चोर शिरले होते. यावेळी सैफ अली खानची चोरासोबत झटापट झाली. चोराने धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. यामध्ये सैफच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर दुखापत झाली असून सध्या त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, मुंबईतील कायदा व सुव्यस्था ढासळण्याचे हे लक्षण आहे. याचे कारण म्हणजे मध्यंतरी त्याच भागात एकाची हत्या झाली होती. त्यानंतर आता हा दुसरा प्रयत्न म्हणता येईल. या सगळ्या गोष्टी चिंताजनक आहेत. राज्य सरकारने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी, कारण गृहखाते त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी या गोष्टीकडे अधिक गांभीर्याने बघावे, अशी मागणी शरद पवार यांनी केली होती.
हेही वाचा – Uddhav Thackeray : पक्ष उद्धव ठाकरे की संजय राऊत चालवतात? ‘त्या’ गोष्टीवरून शिवसेनेचा नेता भडकला
Comments are closed.