Devendra Fadnavis reprimands Babanrao Lonikar for making controversial statements


सर्वसामान्य जनतेविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपाचे माजी मंत्री, आमदार बबनराव लोणीकर यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कान टोचले आहेत. गुरुवारी (ता. 26 जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या विधानाबाबत विचारणा करण्यात आली.

मुंबई : सर्वसामान्य जनतेविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपाचे माजी मंत्री, आमदार बबनराव लोणीकर यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कान टोचले आहेत. गुरुवारी (ता. 26 जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या विधानाबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी लोणीकर यांचे विधान चुकीचे असून अशी विधाने करणे योग्य नसल्याची समज त्यांना देण्यात येईल, असे फडणवीस यांनी प्रसार माध्यमांसमोर सांगितले. त्यामुळे लोणीकरांना आता पक्षातील प्रमुख नेत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Devendra Fadnavis reprimands Babanrao Lonikar for making controversial statements)

भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी एका कार्यक्रमात केलेल्या एका वक्त्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्यावर विरोधकांकडून सडकून टीका करण्यात येत आहे. यासर्व पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी त्यांना समज दिली आहे. याबाबत अधिक बोलताना फडणवीस म्हणाले की, बबनराव लोणीकरांचे विधान एकदम चुकीचे आहे. त्यांनी जरी काही लोकांना उद्देशून हे विधान केले असेल तरीही अशा प्रकारचे विधान करण्याचा अधिकार कोणालाही नाही. देशाचे पंतप्रधान जेव्हा सांगतात की, मी देशाचा प्रधान सेवक आहे आणि आम्ही सर्व जनतेचे सेवक आहोत, तर आम्हाला मालक बनता येणार नाही. त्यामुळे बबनराव लोणीकर यांचे जे वक्तव्य टीव्हीवर आले आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करणे योग्य नाही. तशी समज बबनराव लोणीकर यांना देण्यात येईल, असे फडणवीसांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.

हेही वाचा… Maharashtra Monsoon Session : विधिमंडळाचे अधिवेशन तीन आठवडे चालणार, जनसुरक्षा विधेयक मांडण्यात येणार

तर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही लोणीकर यांना सुनावले आहे. पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला, कुठल्याही नेत्याला, कुठल्याही आमदाराला, कुठल्याही खासदाराला, जनप्रतिनिधींना बबनराव लोणीकर ज्या पद्धतीने बोलले त्या पद्धतीने बोलायचा अधिकार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

बबनराव लोणीकर काय म्हणाले होते?

एका कार्यक्रमात आमदार बबनराव लोणीकर म्हणाले होते की, सोशल मीडियावर चार-पाच कार्टी असतात, त्यांचा मायचा पगार बबनराव लोणीकरने केला. त्याच्या बापाचे पेन्शन बबनराव लोणीकरने केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 6 हजार रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले. तुझ्या आई, बहीण आणि पत्नीला लाडकी बहीण योजनेतून पैसे दिले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे आणि तुझ्या पायावरची चप्पल आमच्यामुळेच. हातातले ते मोबाईलचे डबडं आमच्यामुळे. त्यामुळे आमचेच घेतो आणि आमच्यावरच तंगड्या वर करतो, असे वादग्रस्त वक्तव्य लोणीकर यांनी केले आहे.



Source link

Comments are closed.