शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, पण त्याचा फायदा…; मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत मोठं वक्तव्य, अतिवृष

देवेंद्र फडणवीस : 15 हजार 7 कोटी रुपयांची थेट मदत शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रत्यक्ष खात्यात गेलेली आहे. पिकाचे पैसे 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात गेलेले आहेत. 27,000 विहिरींच्या दुरुस्तीकरिता आपण 80 कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत दिली आहे. रविवारी हिवाळी अधिवेशनातील (Maharashtra Winter Session 2025) अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही भाष्य केले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपण 32 हजार कोटीचे पॅकेज घोषित केले होते. 32 हजार रुपये कोटीच्या पॅकेजमध्ये दहा हजार कोटी इन्फ्रास्ट्रक्चरचे होते. दोन हजार कोटी आपण नरेगातून देणार होतो आणि बाकी सगळी थेट मदत होती. या पॅकेजमध्ये तीन हेक्टरची मर्यादा आपण ठेवली होती. तीन हेक्टरच्या एनडीआरएफच्या मर्यादेत पैसे दिल्यानंतर देखील आपण रब्बीच्या हंगामाकरता दहा हजार रुपये अतिरिक्त हेक्टरी देण्याचा निर्णय घेतला होता. पशुपालकांना पशुधनहानीसाठी आपण पैसे द्यायचे कबूल केले होते. त्याचे आपण सर्व पैसे दिलेले आहेत. नरेगाच्या अंतर्गत काम सुरू आहेत. अतिवृष्टीमुळे ज्या बुजलेल्या सिंचन विहिरी होत्या, त्या कामाकरिता तीस हजाराच्या मर्यादेपर्यंत पैसे द्यायचे होते. 27,000 विहिरींच्या दुरुस्तीकरिता आपण 80 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Devendra Fadnavis: 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 10-10 हजार जमा

सार्वजनिक उपयुक्त सुविधा, विद्युत कामे, रस्ते, इमारती, लघु व मध्यम तलाव आणि दुरुस्ती पूर्ण बांधणी या संदर्भातील कामांना देखील आपण पैसा उपलब्ध करून दिलेला आहे. त्यातल्या काही कामांना आपण सांगितले आहे की, तुम्ही कामाची सुरुवात करा. आपण पुढच्या बजेटमध्ये निधी उपलब्ध करून देऊ. शेती पिकाच्या नुकसानीकरिता जे पैसे दिले होते आणि बी बियाणांकरिता पैसे दिले होते, त्या संदर्भात दोन जीआर आपण काढले होते. पहिला जीआर 10 हजार पाचशे 16 कोटींचा, दुसरा जीआर 9 हजार 611 कोटींचा होता. यापैकी 15 हजार 7 कोटी रुपयांची थेट मदत शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यात गेलेली आहे. पिकाचे पैसे 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात गेलेले आहेत, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis: कुठल्याही शेतकऱ्यांचा कापूस परत जाणार नाही

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, इथे सांगण्यात आलं की, दहा हजार रुपयांची घोषणा करण्यात आली. पण, ते गेले नाहीत. दहा हजार रुपये 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात गेलेले आहे. तसेच राज्यात कापूस खरेदी संदर्भात देखील प्रश्न निर्माण झाला होता. विशेषतः यावर्षी सीसीआयने पहिल्यांदाच उत्पादकतेवर आधारित कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. काही ठिकाणी सरासरी उत्पादकता बाराशे क्विंटलची आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होतं होते. त्या संदर्भात आपण केंद्र सरकारला विनंती केली. केंद्र सरकारशी आपण चर्चा करून हा निर्णय केला की, उत्पादकता पकडत असताना उत्पादकतेतले पहिले तीन जिल्हे आहेत, त्यातील सर्वाधिक उत्पादकता जी आहे त्यालाच पकडावे. त्या संदर्भातील निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 1277 किलो प्रति हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या ऐवजी 2,368 किलो प्रति हेक्टर पद्धतीने आपण निर्णय घेतलेला आहे. यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांचा कापूस परत जाणार नाही, असे त्यांनी म्हटले.

Devendra Fadnavis: कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे, बँकांना नाही

कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारने कमिटमेंट केली आहे. आपल्यावर सध्या अतिवृष्टीचा ताण आलेला आहे. त्यामुळे आपलं बजेट अडचणीत आहे. या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत निर्णय आपण घोषित केलेला आहे. कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे, बँकांना नाही. 2017 ला आपण कर्जमाफी केली. 2020 केली. आपण कर्जमाफी केली तरीदेखील आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागत आहे. याचा अर्थ कुठेतरी आपल्या नियोजनात अडचण आहे. आपल्या कर्जमाफीतही आहे आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीत देखील आहे. त्यामुळे यावर एकदम उपाययोजना होणार नाहीत. पण हळूहळू टप्प्याटप्प्याने काय उपाययोजना करता येतील आणि त्या उपाययोजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी अशा पद्धतीने समिती काम करत आहे. आपण एक जुलैपर्यंत कर्जमाफीची योजना काय असेल? याबाबत आम्ही घोषणा करू, असे त्यांनी म्हटले.

आणखी वाचा

Devendra Fadnavis: आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस

आणखी वाचा

Comments are closed.