Devendra Fadnavis targets opponents after Jayshree Patil joins BJP


दिवंगत वरिष्ठ काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून आणि माजी दिवंगत मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी आज (18 जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

मुंबई : दिवंगत वरिष्ठ काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून आणि माजी दिवंगत मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी आज (18 जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला सांगलीमध्ये मोठे खिंडार पडले आहे. कारण जयश्री पाटील या सांगलीतल्या बड्या प्रस्थ आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला सांगली जिल्ह्यात फायदा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जयश्री पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. (Devendra Fadnavis targets opponents after Jayshree Patil joins BJP)

भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात आयोजित पक्षप्रवेशावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचं कार्य मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. सांगली महापालिका असेल, सांगली जिल्हा परिषद असेल, तिथे दोन वेळा खासदार असतील, आमदार असतील, अशा विविध जागी भाजपाला खूप चांगलं यश मिळालं आहे. त्यामुळे आमची साहजिक अपेक्षा होती की, आपला पक्ष सांगलीत आणखी मजबूत करण्यासाठी अजून चांगली मंडळी जी वेगवेगळ्या पक्षांत आहेत, पण त्यांना तिथे न्याय मिळत नाही. त्यांना सोबत घेऊन अतिशय मजबुतीने काम वाढवलं पाहिजे, असा विचार आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Politics : फडणवीस करून जातात आणि नाव दुसऱ्याचं लागतं; भाजपाच्या नेत्याने अजितदादांविरोधात थोपटले दंड

जयश्री पाटील यांच्या भाजपा प्रवेशावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सगळ्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे आज जयश्री पाटील यांचा प्रवेश झाला आहे. मी त्यांच्यासोबत जेव्हा बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की, माझ्या प्रवेशावेळी तुम्ही आलंच पाहिजे. खरंतर आपल्याकडे प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत प्रवेश होता. मुख्यमंत्री प्रवेशाला फारसे हजर राहत नाही. पण मलादेखील वाटलं की, एवढ्या मोठ्या वसंतदादांच्या घराण्यातील जयश्री पाटील यांचा प्रवेश असल्यामुळे आपण देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहायला पाहिजे. त्यामुळे मी सुद्धा या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला आलो. तसेच आपले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वत: या संपूर्ण प्रवेशाकरता मेहनत घेतली. त्यांनी स्वत: जाऊन चर्चा केली आणि नीट मध्यस्थी केली, अशी माहीती देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

हेही वाचा – Jayant Patil : पक्षांतरासाठीच भेटलो असेल…; भाजपा प्रवेशाच्या चर्चेवर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया



Source link

Comments are closed.