Devendra Fadnavis warns Pakistan over Indus Water Treaty
भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यात सिंधू पाणी करारही स्थगित केला. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना प्रशअन विचारला असता देवेंद्र फडणवीस यांना पाकिस्तानला इशारा दिला आहे.
पुणे : जम्मू-काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 नागरिकांचा मृत्यू झाला. यात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात जाऊन या दोन्ही कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. (Devendra Fadnavis warns Pakistan over Indus Water Treaty)
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जे लोकं पाकिस्तानमधून व्हिसा घेऊन आलेले आहेत, त्यांची सर्व माहिती राज्य सरकारकडे उपलब्ध आहे. जर कोणी अवैधरित्या आलं असेल तर त्यांना शोधण्याची कारवाई नेहमीच सुरू असते. परंतु ज्याप्रमाणे अवैध बांगलादेशी आपल्याकडे सापडतात, त्याप्रमाणे अवैध पाकिस्तानी सापडत नाहीत. त्यामुळे आता पहिल्यांदा जे लोक व्हिसा घेऊन पाकिस्तानमधून आलेले आहेत. त्यांना पहिल्यांदा 48 तासांत बाहेर काढणार आहोत. त्या संदर्भात पोलीस व्यवस्थित काम करत आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस यांच्या प्रश्न विचारण्यात आला की, पाकिस्तान सरकाकडून न्यूक्लियर बॉम्बचा इशारा देण्यात येत आहे. यावर ते म्हणाले की, खरं म्हणजे पाकिस्तानच्या सरकारला हे समजलं पाहिजे की, त्यांची निर्भरता ही भारतावर आहे. ज्या प्रकारे ते दहशतवाद्यांना समर्थन देतात आणि मानवतेचा एक प्रकारे खून करतात. मला असं वाटतं की, जगातला कुठलाही देश पाकिस्तानबरोबर उभा राहूच शकत नाही. ही पाकिस्तानची सध्याची परिस्थिती आहे. त्यांच्याकडे खायला पैसे नाहीत आणि ते न्यूक्लियर बॉम्ब काय सांगतात? असा प्रश्न उपस्थित करत फडणवीस यांनी पाकिस्तानची खिल्ली उडवली.
भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यात सिंधू पाणी करारही स्थगित केला. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना प्रशअन विचारला असता ते म्हणाले की, सिंधू नदीच्या पाण्यावर पाकिस्तान निर्भर आहे, जर ते पाणी भारताने अडवणं सुरू केलं तर पाकिस्तानवर अक्षरश: तहानेने मरण्याची वेळ येईल. त्यामुळे कधीकधी अशा प्रकारची जागा दाखवावी लागते, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.