Devendra Fadnavis will complain to Eknath Shinde regarding Sanjay Gaikwad’s statement regarding Maharashtra Police
पुणे : शिवसेना शिंदे गट आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांबद्दल केलेल्या एका वक्तव्यावरून महायुतीत वाद पेटण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खाते कोणतेही नाही. पोलिसांनी छाप्यात 50 लाख पकडले तरी 50 हजार दाखवतात, असे विधान संजय गायकवाड यांनी केले होते. याप्रकरणी संजय गायकवाड यांना समज द्यावी, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगणार आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉर्निंग दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाम येथील हल्ल्यात मृत पावलेल्या कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या कुटुंबीयांची आज भेट घेतली. त्यानंतर यशदा येथील कार्यक्रम झाल्यावर ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. (Devendra Fadnavis will complain to मराठी regarding Sanjay Gaikwad’s statement regarding Maharashtra Police)
व्हिसा घेऊन आलेल्यांना 48 तासांत देशातून बाहेर काढायचे
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जे पाकिस्तानी लोक व्हिसा घेऊन आलेले आहेत, त्यांची माहिती राज्य सरकारकडे उपलब्ध आहे. त्यांची ओळख पटवून, नोटीस दिलेली आहे. परत पाठवण्याची व्यवस्था झालेली असून परत पाठवण्यात येत आहे. व्हिसा घेऊन आलेल्यांना 48 तासांत देशातून बाहेर काढायचे आहे. यासाठी पोलीस काम करत आहेत.
कोणताही देश पाकिस्तानमागे उभा नाही
मुद्दा जेव्हा देशाच्या सुरक्षेतेचा आणि अस्मितेचा येतो, तेव्हा काही कडक निर्णय घ्यावे लागतात. पाकिस्तानची निर्भरता भारतावर आहे, हे येथील सरकारला कळले पाहिजे. पाकिस्तान आतंकवादाला समर्थन देतो, मानवतेचा खून करतो, आज जगातील कुठलाही देश त्यांच्यासोबत उभा राहू शकत नाही, ही त्यांची परिस्थिती आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
पाकिस्तानकडे खायला पैसे नाहीत
आमच्याकडे न्यूक्लियर बॉम्ब आहे, अशी धमकी पाकिस्तानच्या मंत्र्याने दिली आहे, याबदल विचारल्यावर फडणवीस यांनी म्हटले, पाकिस्तानकडे खायला पैसे नाहीत, कशाचा न्यूक्लियर बॉम्ब सांगतात.. लोक उपाशी मरत आहेत, काय त्यांची अवस्था?
ते 100 वर्षे मला मुख्यमंत्री ठेवतील
2040 पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार, बावनकुळेंच्या वक्तव्यावर विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ते 100 वर्षे मला मुख्यमंत्री ठेवतील. बाकी राजकारणात रोल बदलत असतात. ते बदलले पाहिजे, कुणी फार काळ एकाच पदावर राहत नाही त्यामुळे जेव्हा माझा रोल बदलायचा तेव्हा तो बदलेल.
… तर ॲक्शन घेऊ
संजय गायकवाड यांनी पोलिसांबद्दल केलेल्या विधानावर फडणवीस यांनी म्हटले, पोलिसांबद्दल असं बोलणं योग्य नाही. मी स्वतः शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या हे असं चालणार नाही. वारंवार ते जर असं बोलत असतील तर त्यांच्यावर ॲक्शन घेऊ.
हल्ल्यात मृत्यू पडलेल्या कुटुंबीयांना सरकार हवी ती मदत करणार
अतिशय भावूक प्रसंग होता. काहीच शब्द नव्हते. आसावरी जगदाळे यांनी पहलगाम येथील अनुभव सांगितल्यानंतर, ते ऐकून कुणाचेही मन हेलावून जाईल आणि रक्त पेटेल, असे ते वर्णन होते. गनबोटे आणि जगदाळे कुटुंबासोबत घडलेली घटना अनाकलनीय होती. त्यांचा अनुभव ऐकल्यावर आतंकवादाशी लढण्याचा निर्धार आणखी मजबूत झाला आहे. हल्ल्यात मृत्यू पडलेल्या कुटुंबीयांना सरकार हवी ती मदत करणार आहे, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे.
हेही वाचा – Chandrahar Patil : यापुढेही भेट घेण्यात…; उदय सामंतांच्या घरी स्नेहभोजनानंतर चंद्रहार पाटलांची प्रतिक्रिया
Comments are closed.