Kokan News – समुद्रात वादळ सदृश्य वातावरण; नौका किनाऱ्याकडे परतल्या

समुद्रात वादळ सदृश्य वातावरण निर्माण झाल्यानंतर स्थानिक नौकांबरोबर इतर नवकाही सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षित असलेल्या देवगड बंदराचा आश्रय घेतला यावेळी वादळी वारे व पाऊस यामुळे समुद्रातील वातावरण मच्छीमारांसाठी प्रतिकूल नसल्याने आश्रयासाठी देवगड बंदरात गुजरात राज्यातील तब्बल शंभरहून अधिक नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत.

हवामान विभागाने 28 ते 29 सप्टेंबर या कालावधीत काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा तसेच समुद्रात 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मच्छीमारीसाठी जाऊ नये असा संदेश आल्याने समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. यामध्ये स्थानिक नौकांबरोबर मालवण तसेच गुजरात मधील लोकांचा देखील समावेश आहे.

समुद्रात मच्छीमारी करताना वाऱ्यामुळे समुद्र खवळण्यास सुरुवात झाल्यानंतर मच्छीमारी करत असलेल्या नौका सुरक्षित असलेल्या देवगड बंदराचा आश्रय घेतात यावर्षी अशीच परिस्थिती निर्माण झाल्यानंतर स्थानिक नौकांबरोबर रत्नागिरी मालवण येथील नौकांप्रमाणेच गुजरात या परराज्यातील नौकाही आसरासाठी देवगड बंदरात यापूर्वी दाखल झाल्या आहेत. सध्या स्थिती ही वातावरण खराब असल्याने समुद्रातील मच्छीमारी ठप्प झाली आहे. देवगड बंदरात नौकांनी गजबजले असून वातावरण निवळल्यानंतर या नौका मच्छीमारीस पुन्हा समुद्रात प्रयाण करणार आहेत. राज्यातील नौकांची वादळी वातावरणामुळे सुरक्षित असलेल्या देवगड बंदरामध्ये असल्यास येण्याचा कल जास्त असून यामुळे देवगड बंदराचे महत्व दिवसेंदिवस वाढू लागले आहे. त्या दृष्टीने हे बंदर लवकरात लवकर विकसित व्हावे अशी अपेक्षा देवगड वासियांमधून व्यक्त होत आहे.

Comments are closed.