नाताळ सुट्टीच्या हंगामात देवगड शहर पर्यटकांनी गजबजले! हॉटेल लॉजिग फुल्ल! स्थानिक सोयी सुविधांचा अभाव

हिवाळी सुट्टीच्या हंगाम सुरू झाल्यानंतर देवगड परिसरातील सर्व निसर्गरम्य ठिकाणी त्याचबरोबर समुद्र बीच हे पर्यटकांनी गजबजुन गेले असून स्थानिक बाजारपेठेत हॉटेल व्यवसायिक लॉजिंग व्यवसायिक यांना देखील पर्यटकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सुट्टीत आलेल्या पर्यटकांमुळे येथील हॉटेल लॉजिंग ही गजबजुन गेली असून गोवा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण ,कर्नाटक व अन्य प्रांतातून पर्यटक मोठ्या प्रमाणात देवगड शहर व आजूबाजूच्या परिसरात प्रामुख्याने कुणकेश्वर, मिठबाव मीठमुंबरी या परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली आहे.

प्रामुख्याने देवगड येथील पवन चक्की गार्डन स्वच्छ देवगड समुद्रकिनारा,ही पर्यटकांची प्रमुख पसंती असून किल्ले देवगड, ऐतिहासिक श्री गणेश मंदिर ,दीपगृह याबरोबर येथील प्रामुख्याने मालवणी लज्जतदार ताज्या मासळी जेवणाची चव,सोलकढी आमरस पुरीचा य आस्वाद घेण्याकरता पर्यटक मोठ्या प्रमाणात देवगडमध्ये दाखल झाले आहेत. पर्यटकांना चा ओढ हा देवगड मध्ये मोठ्या प्रमाणात होत असताना स्थानिक पातळीवर देवगड व आजूबाजूच्या परिसरात पर्यटकांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधांचा अभाव हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पर्यटकांची नाराजी व्यक्त होत आहे .सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असूनही याठिकाणी सुलभ प्रसाधनगृह,सार्वजनिक शौचालय अपुरा पाणीपुरवठा त्याचबरोबर सदस्थितीत देवगड जामसांडे शहरात खंडित झालेला पाणीपुरवठा त्याने पर्यटकांची होत असलेली गैरसोय प्रसंगी व्यापारी बंधूंना देखील या खंडित पाणीपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत असून स्थानिक नागरिक ,त्याचबरोबर व्यापारी बंधूंना 1000 लिटरला रुपये 400/- एवढी रक्कम मोजून विकतचे पाणी आणून पर्यटकांची सोय करणे भाग पडत आहे. या सर्व सोयी सुविधांच्या अभावाकडे मात्र स्थानिक नगरपंचायत प्रशासन त्याचप्रमाणे स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे.

Comments are closed.