देवनार ऊर्जा प्रकल्प: कचरा आणि वीज या दोन्ही संकटांवर उतारा! 1020 कोटींचा देवनार प्रकल्प मे 2026 मध्ये कार्यान्वित होणार आहे

- प्रतीक्षा संपली!
- देवनार लँडफिल येथे 7 मेगावॅट वीजनिर्मितीसाठी ग्रीन सिग्नल
- पालिकेची मोठी घोषणा
मुंबई : मुंबई महापालिकेने शहरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य आणि शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी 2022 मध्ये देवनार लँडफिल हाती घेण्यात आले. वीज निर्मिती तब्बल चार वर्षांच्या कालावधीनंतर हा प्रकल्प आता पूर्ण झाला आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प मे 2026 मध्ये पूर्णत: कार्यान्वित करण्याचा पालिकेचा मानस आहे.या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्या असून येत्या सात महिन्यांत हा प्रकल्प कार्यान्वित होऊन प्रत्यक्षात वीजनिर्मिती सुरू होईल, अशी माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे.
प्रकल्पाची व्याप्ती आणि उद्देश
मुंबई शहरात तसेच पूर्व आणि पश्चिम उपनगरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी मुंबई महापालिकेने देवनार डम्पिंग ग्राऊंडवर हा प्रकल्प उभारला आहे.
- क्षमता: हा प्रकल्प दररोज 600 टन क्षमतेनुसार कचऱ्यावर प्रक्रिया करेल.
- वीज निर्मिती: या प्रक्रियेतून अंदाजे 7 मेगावॅट वीजनिर्मिती होईल.
- तंत्रज्ञान: प्रकल्पासाठी विंडो कंपोस्टिंग आणि जाळणे तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
प्रकल्पाचे कंत्राट मेसर्स चेन्नई एमएसडब्ल्यू प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आले आहे. हा करार एकूण 18 वर्षे 4 महिन्यांच्या कालावधीसाठी असून त्याची सुरुवात 4 जून 2022 पासून झाली आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत 1020 कोटी रुपये असून, त्यात कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
मुंबई : अवैध मासेमारीला 'ड्रोन' झाकणार! 1940 बोटींवर कारवाई, पण मच्छीमार समितीचा आक्षेप सुरूच
पर्यावरणीय मंजुरी मिळाली; आयुक्त गगराणींचा दिलासा
महापालिका आयुक्त भूषण गगराणी म्हणाले, “देवनार डम्पिंग ग्राऊंडवर 9 एकर जागेवर हा 'वेस्ट टू पॉवर प्लांट' उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाला असून येत्या सात महिन्यांत तो कार्यान्वित होईल. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरण विभागाची परवानगी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. मात्र, पर्यावरण विभागाने आम्हाला आठवड्याभरापूर्वी परवानगीचे पत्र पाठवले आहे.”
वीज वितरणाचा निर्णय प्रलंबित
या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेच्या वितरणाबाबत अंतिम निर्णय होणे बाकी आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी स्पष्ट केले:
“सर्व मंजुऱ्या मिळाल्यानंतर वीज वितरणाबाबत निर्णय घेतला जाईल. या प्रकल्पाजवळ अदानी समूहाचा कॉरिडॉर आहे. त्यातून निर्माण होणारी वीजही तेथे वळवता येते, आणि त्या बदल्यात त्यांना पैसे देता येतात. मात्र, याबाबत कोणताही निर्णय किंवा अदानी समूहाशी चर्चा झालेली नाही. सर्व मंजुरी मिळाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल.”
Comments are closed.