साईचरणी एक कोटीचा सुवर्णहार

श्रीसाईबाबांचा 107 वा पुण्यतिथी उत्सव नुकताच 1 ते 4 ऑक्टोबर या कालावधीत पार पडला. या पुण्यतिथी उत्सव काळात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या सांगतादिनी आंध्र प्रदेशातील एका भाविकाने बाबांच्या चरणी तब्बल 1 कोटीचा हार अर्पण केला आहे. हा तब्बल 945 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार आहे. सुवर्णहार नवरत्नांनी सजलेला असून त्याची किंमत तब्बल 1 कोटी 3 लाख रुपये आहे. मौल्यवान हार संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते साईबाबांना अर्पण करण्यात आला. देणगीदार साईभक्ताचे नाव सांगण्यात आलेले नाही.
Comments are closed.