MS धोनीनंतर चेन्नईचा आता हुकमी एक्काही संघातून OUT; कोच स्टीफन फ्लेमिंगने सांगून टाकलं, नेमकं क
Dewald Brevis ने RR vs CSK IPL 2026 नाकारले: आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आपला मोहीम सोमवार 30 मार्च रोजी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धच्या सामन्याने सुरू करणार आहे. मात्र या सामन्याच्या अवघ्या 24 तास आधी संघासाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. याआधीच एमएस धोनी (MS Dhoni) पहिले सहा सामने गमावू शकतात, अशी माहिती समोर आली होती. आता त्यात भर म्हणजे डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) देखील काही सामने बाहेर राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ब्रेविस सध्या साइड स्ट्रेनच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे तो सुरुवातीचे दोन-तीन सामने गमावू शकतो, अशी माहिती आहे. संघाचे कोच स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांनीही याची पुष्टी करत ब्रेविस पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट केले. चेन्नईचा पहिला सामना राजस्थानविरुद्ध होणार असून, त्यानंतर 3 एप्रिलला पंजाब किंग्स आणि 5 एप्रिलला आरसीबीविरुद्ध सामने आहेत. या तिन्ही सामन्यांत धोनी खेळण्याची शक्यता अत्यंत कमी मानली जात आहे. त्यामुळे ब्रेविसही उपलब्ध नसेल तर संघासाठी ही मोठी अडचण ठरू शकते.
ब्रेविसच्या जागी कोण?
ब्रेविस संघाबाहेर राहिल्यास चेन्नईच्या मधल्या फळीला मोठा धक्का बसू शकतो. याआधीच नॅथन एलिस पूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे, तर आता धोनी आणि ब्रेविसच्या अनुपस्थितीमुळे संघाची ताकद कमी झालेली दिसते. अशा परिस्थितीत संघ मॅथ्यू शॉर्ट याला विदेशी पर्याय म्हणून आणि सरफराज खान याला भारतीय फलंदाज म्हणून संधी देऊ शकतो.
दरम्यान, एलिसच्या जागी चेन्नईने स्पेन्सर जॉन्सन याची निवड केली होती. तोही पूर्णपणे फिट नसल्याने संघाने मोठा धोका पत्करला होता. आता ब्रेविसच्या अनुपस्थितीत संघाचा मधला फळा अधिकच कमकुवत होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आयपीएल 2025 मध्ये ब्रेविसने चेन्नईसाठी शानदार कामगिरी करत मोठी छाप सोडली होती.
ब्रेव्हिसशिवाय सीएसके संघाची संभाव्य प्लेइंग 11 :
ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), उर्विल पटेल, आयुष म्हात्रे, सरफराज खान/मॅथ्यू शॉर्ट, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, अकेल होसेन, नूर अहमद, मॅट हेन्री, खलील अहमद.
चेन्नई सुपर किंग्ज संघ – (IPL 2026 CSK पूर्ण संघ)
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, एमएस धोनी, संजू सॅमसन, डेवाल्ड ब्रेविस, उर्विल पटेल, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, रामकृष्ण घोष, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, गुर्जपनीत सिंग, श्रेयस गोपाल, मुकेश चौधरी, राष्ट्रीय चौधरी, ए. कार्तिक शर्मा, मॅथ्यू शॉर्ट, अमन खान, सरफराज खान, मॅट हेन्री, राहुल चहर, जॅक फॉल्क्स, प्रशांत वीर.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.