ऑस्ट्रेलियात डेवाल्ड ब्रेविसचे वर्चस्व! विराट कोहलीचा 8 वर्षांचा रेकाॅर्ड मोडत रचला नवा इतिहास
देवाल्ड ब्रेव्हिस रेकॉर्ड: दक्षिण आफ्रिकेच्या 22 वर्षीय युवा खेळाडू डेवाल्ड ब्रेविसने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत बॅटने अप्रतिम कामगिरी केली. (South Africa vs Australia T20 series) या मालिकेत त्याने 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावले. तिसऱ्या टी20 सामन्यात ब्रेविसने 53 धावांची खेळी करून विराट कोहलीचा 8 वर्षांपूर्वीचा रेकाॅर्ड मोडला, तर बाबर आझमलाही एका बाबतीत मागे टाकण्यात तो यशस्वी झाला.
ऑस्ट्रेलियामध्ये टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये परदेशी फलंदाजाने सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत आता डेवाल्ड ब्रेविस पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. यापूर्वी हा रेकाॅर्ड विराट कोहलीच्या नावावर होता. ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच दौरा असलेल्या डेवाल्ड ब्रेविसने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 14 षटकार मारले आहेत. यासह, त्याने कोहलीचा 13 षटकारांचा रेकाॅर्ड मोडला आहे. (Dewald Brevis vs Virat Kohli)
ऑस्ट्रेलियामध्ये टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे परदेशी खेळाडू:
डेवाल्ड ब्रेविस – 14 षटकार
विराट कोहली -13 षटकार
शिखर धवन – 9 षटकार
आंद्रे रसेल – 9 षटकार
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीतही डेवाल्ड ब्रेविसने बाबर आझमचा रेकाॅर्ड मोडला. मात्र, तो विराट कोहलीचा रेकाॅर्ड मोडण्यापासून केवळ 20 धावांनी दूर राहिला. या मालिकेत ब्रेविसने एकूण 180 धावा केल्या, तर बाबर आझमने 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 163 धावा केल्या होत्या. या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या विराट कोहलीने 2015-16 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत एकूण 199 धावा केल्या होत्या. (Dewald Brevis record)
Comments are closed.