डेवाल्ड ब्रेविसचा खणखणीत षटकार ठरला विनोदी, चेंडूच घेऊन पळाला चाहता! व्हायरल VIDEO एकदा पाहाच
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा एकदिवसीय: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात प्रोटियाज संघाला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला, तरीही युवा स्टार फलंदाज डेवाल्ड ब्रेविसने आपल्या शॉट्सने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सामन्यादरम्यान त्याने असा एक षटकार मारला, ज्यामुळे मैदानात विनोदी आणि आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले. (Fan runs with ball Brevis six)
सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या ब्रेविसने 28 चेंडूत 49 धावा ठोकल्या. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 175 होता. त्याच्या खेळीत 2 चौकार आणि 5 गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. विशेषतः झेवियर बार्टलेटच्या षटकात त्याने मारलेला पूल शॉट प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील. वेगवान गोलंदाजाचा बाउन्सर त्याने इतक्या ताकदीने मारला की, चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर पोहोचला. (Brevis vs Australia 3rd ODI)
चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेल्यावर प्रेक्षकांमध्ये तो पकडण्याची स्पर्धा लागली. यावेळी एका चाहत्याने चेंडू पकडला आणि तो घेऊन पळून गेला. यानंतर, ग्राउंड स्टाफने लगेच हस्तक्षेप केला, तेव्हा अखेरीस त्या चाहत्याने चेंडू परत देण्याचा निर्णय घेतला. हे संपूर्ण दृश्य कॅमेरात कैद झाले आणि आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Dewald Brevis six video)
देवाल्ड ब्रेव्हिसने मैदानातून सहा तोडले. 🤯pic.twitter.com/mttfcvgxft
– मुफद्दाल वोहरा (@mufaddal_vohra) ऑगस्ट 24, 2025
Comments are closed.