सामना सुरू होण्याआधीच काळजावर घाव! मैदानावर कोचचा मृत्यू, क्रिकेटविश्व स्तब्ध, नेमकं काय घडलं?
ढाका कॅपिटल्सचे प्रशिक्षक महबूब अली झाकी यांचे निधन बांगलादेशमधून क्रिकेट विश्वाला हादरवणारी आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. 27 डिसेंबर रोजी बांगलादेश प्रीमियर लीग (BPL) च्या नव्या हंगामाची सुरुवात होणार होती. सिल्हट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ढाका कॅपिटल्स आणि राजशाही रॉयल्स यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार होता. मात्र सामना सुरू होण्याआधीच ढाका कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक महबूब अली जकी यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले.
सामना सुरू होण्यापूर्वीच हृदयविकाराचा झटका
ढाका कॅपिटल्स आणि राजशाही रॉयल्सचे खेळाडू सामना सुरू होण्यापूर्वी वॉर्म-अप करत होते. त्याच वेळी महबूब अली जकी यांची प्रकृती अचानक बिघडली आणि ते मैदानावरच कोसळले. संघाच्या वैद्यकीय पथकाने तात्काळ उपचार सुरू करत त्यांना CPR देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. मैदानावर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेतून त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
प्रसंग पाहून सर्वजण सुन्न
सहाय्यक प्रशिक्षक मैदानावर कोसळताना दोन्ही संघांचे खेळाडू आणि कोचिंग स्टाफ तेथेच उपस्थित होते. हा प्रसंग पाहून सर्वजण सुन्न झाले. काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आणि मैदानावर एकच गोंधळ उडाला. ढाका कॅपिटल्सने अधिकृत निवेदनात सांगितले की, प्रशिक्षणादरम्यान महबूब अली जकी यांना अस्वस्थ वाटू लागले होते. ते अचानक मैदानावरच कोसळले. रुग्णालयात नेण्यापूर्वी मैदानावरच CPR देण्यात आले, मात्र त्यांना वाचवता आले नाही.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून शोक व्यक्त
महबूब अली जकी यांच्या दुर्दैवी निधनावर बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही तीव्र शोक व्यक्त केला आहे. बोर्डाने आपल्या निवेदनात म्हटले आहे, “बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक आणि ढाका कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक यांच्या निधनाने आम्हाला प्रचंड दुःख झाले आहे. आज दुपारी 1 वाजता त्यांचे निधन झाले. वेगवान गोलंदाजीसाठी दिलेले त्यांचे योगदान कधीही विसरले जाणार नाही. त्यांना नेहमीच मोठ्या सन्मानाने आठवले जाईल. या कठीण प्रसंगी बांग्लादेश क्रिकेट बोर्ड त्यांच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभा आहे.”
2008 मध्ये कोचिंग कारकिर्दीची सुरुवात
साल 2008 मध्ये त्यांनी बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) मध्ये हाय परफॉर्मन्स कोच म्हणून आपल्या कोचिंग कारकिर्दीची सुरुवात केली. अल्पावधीतच ते बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजीच्या सेटअपमधील एक अत्यंत आदरणीय आणि विश्वासार्ह व्यक्तिमत्त्व बनले. विशेषतः 2016 मध्ये भारतात झालेल्या टी-20 विश्वचषकादरम्यान, वेगवान गोलंदाज तस्कीन अहमदच्या बॉलिंग अॅक्शनची तपासणी सुरू असताना जकी यांनी त्याला मोलाचे मार्गदर्शन केले. त्या कठीण काळात त्यांनी दिलेल्या तांत्रिक मदतीमुळे तस्कीन अहमद पुन्हा आत्मविश्वासाने मैदानात उतरू शकला. बांगलादेश क्रिकेटसाठी त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने BCB गेम डेव्हलपमेंट विभागाचे स्पेशलिस्ट वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक महबूब अली झाकी (59) आणि बांगलादेश प्रीमियर लीग (BPL) T20 2026 मधील ढाका कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
आज 27 डिसेंबर 2025 रोजी त्यांचे निधन झाले… pic.twitter.com/p1ImtCNX0G
— बांगलादेश क्रिकेट (@BCBtigers) 27 डिसेंबर 2025
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.