Dhananjay Munde and Anjali Damania dispute is now in court
मंत्री धनंजय मुंडे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यातील वाद आता वाढताना दिसत आहे. कारण दोघांनी आता एकमेकांविरोधात न्यायालयात जाण्याची भाषा केली आहे.
मुंबई : कृषीमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि फवारणी पंपाच्या खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदत घेत अंजली दमानिया यांना परत राजकारणात यायचे असल्यामुळे न्यूज व्हॅल्यू वाढवण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू असल्याचे टीका केली. धनंजय मुंडे यांच्या आरोपानंतर पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत टीका केली. यानंतर आता धनंजय मुंडे आणि अंजली दमानिया हे एकमेकांविरोधात न्यायालयात जाण्याची भाषा केली आहे. (Dhananjay Munde and Anjali Damania dispute is now in court)
बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यावर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड याचे नाव समोर आल्यानंतर भाजपा आमदार सुरेश, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह विरोधी पक्षाकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होताना दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे सुरेश धस आणि अंजली दमानिया हे धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांच्यातील आर्थिक संबंधांचे पुरावे समोर आणत आहेत. काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. मात्र धनंजय मुंडे यांच्याविरोधात जोपर्यंत पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत त्यांचा राजीनामा नाही, अशी भूमिका अजित पवार यांनी बोलून दाखवली आहे. यानंतर आज पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर खळबळजनक आरोप केले. याचपार्श्वभूमीवर आता दोघेही एकमेकांविरोधात न्यायालयात जाण्याचे बोलताना दिसत आहेत.
हेही वाचा – Dhananjay Munde : अंजली बदनामीया म्हणत धनंजय मुंडेंचा संताप, घोटाळ्याच्या आरोपावरही भाष्य
अंजली दमानिया यांनी आज पुन्हा दिवसातून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत माझ्यावर खोटे व बेछूट आरोप केले आहेत. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार व मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे, त्यानंतरच पुढील…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 4, 2025
दमानिया मुंडे एकमेकांविरोधात जाणार न्यायालयात
धनंजय मुंडे यांनी ट्वीट करताना म्हटले की, अंजली दमानिया यांनी आज पुन्हा दिवसातून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत माझ्यावर खोटे व बेछूट आरोप केले आहेत. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार व मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे. त्यानंतरच पुढील कार्यवाही सुरू झाली. यासह इतर अनेक आरोप करणाऱ्या दमानिया यांच्यावर मी लवकरच फौजदारी अब्रु नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहे, असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला. यानंतर अंजली दमानिया यांनी ट्वीट करताना म्हटले की, धनंजय मुंडे आपल्याला अब्रू नुकसानीचा दावा दाखल करायचा असेल तर आपण खुशाल करा. न्यायालय तुमच्यावरच ताशेरे ओढेल, यात मला काडीमात्र शंका नाही. मी वकील पण लावणार नाही, स्वतः ही केस उच्च न्यालयात लढेन, असे अंजली दमानिया यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – Anjali Damania : मुंडेंना मी त्यांची जागा दाखवणार, प्रत्युत्तरात काय म्हणाल्या अंजली दमानिया?
Comments are closed.