Dhananjay Munde on santosh deshmukh murder case and walmik karad suresh dhas-ssa97


Dhananjay Munde On Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून बीडमधील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. वाल्मिक कराड यामागे असल्याचा आरोप करून विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, धनंजय मुंडे यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

संतोष देशमुख हा माझ्या जिल्ह्यातील एक सरपंच होता. देशमुख हत्या प्रकरणात जो कुणी गुन्हेगार आहे, मग तो कुणीही असो, कुणाच्याही जवळचा असो, अगदी माझ्याही जवळचा असला तरी त्याला सोडू नका, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. मुंडे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

– Advertisement –

हेही वाचा : धक्कादायक! शिंदेंच्या शिवसेनेतील आमदाराच्या हत्येचा कट, लातूरमध्ये करणार होते हल्ला; पण…

धनंजय मुंडे म्हणाले, “संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना शासन झालं पाहिजे. तसेच, आरोपींना फाशी झाली पाहिजे, या मताचा मी पहिल्या दिवसापासून आहे. संतोष देशमुख हा माझ्या जिल्ह्यातील एक सरपंच होता. यात जो कुणी गुन्हेगार आहे, मग तो कुणीही असो, कुणाच्याही जवळचा असो, अगदी माझ्याही जवळचा असला तरी त्याला सोडू नका.”

– Advertisement –

“मात्र, राजकारणापोटी माझ्यावर आरोप केले जातात. यामागचं राजकारण सगळ्यांना माहिती आहे,” असं मत मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

“वाल्मिक कराड हे सुरेश धस यांच्याही जवळचे होते. पण, कराड हे माझ्याही जवळचे आहेत. कराडवर दाखल झालेल्या गुन्ह्याची चौकशी पोलीस करत आहेत. चौकशी पारदर्शीपणानं झाली पाहिजे, या मताचा मी आहे. त्यामुळे शासन कुणालाही पाठीशी घालत नाही,” असं मुंडे यांनी सांगितलं.

“माझ्याविरोधात बोलल्याशिवाय एखाद्याचा दिवस उजडत नसेल. माझा कुठल्याही गोष्टीशी संबंध नाही. पण, माझ्याबद्दल मीडिया ट्रायल केली जात आहे. मला राजकारण आणि समाजकारणातून उठविण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा दावा मुंडे यांनी केला आहे.

हेही वाचा : खेळत असताना दोन चिमुरड्या झालेल्या गायब, पण..; पुण्यात समोर आली थरकाप उडविणारी घटना



Source link

Comments are closed.