आज इथे अजितदादा असते तर…; फडणवीसांसमोर धनंजय मुंडेंना भर भाषणात अजित पवारांची आठवण; नेमकं काय

धनंजय मुंडे अजित पवारांवर आज इथे अजितदादा असते तर त्यांना देखील या कार्यक्रमाचा आनंद झाला असता. शेतकरी पशुधनवर अजित दादांचे प्रेम होते, असे वक्तव्य करत माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमोर अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिलाय. परळी वैजनाथ येथे आयोजित महापशुधन एक्स्पोत ते बोलत होते.

धनंजय मुंडे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नातून हा महापशुधन एक्स्पो होत आहे.देवेंद्र भाऊ महाशिवरात्रीऐवजी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी या कार्यक्रमाला आले. प्रभू वैद्यनाथ देवाभाऊंना आपल्या सगळ्यांपेक्षा चांगलं आरोग्य देवो, अशी प्रार्थना करतो. आज इथे अजितदादा असते तर त्यांना देखील या कार्यक्रमाचा आनंद झाला असता. शेतकरी, पशुधनावर अजितदादांचे प्रेम होते. अजितदादा सकाळी लवकर उठून कामाला लागत होते. कारण ते जनावरांचे दूध काढून विकत होते, ही आठवण मी या ठिकाणी विसरणार नाही, असे त्यांनी म्हटले.

Dhananjay Munde: परळी नगर परिषदेत आम्ही महायुतीतच निवडणूक लढवली

धनंजय मुंडे म्हणाले की पुढे म्हणाले की, 1997 ला गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना माझे वडील अण्णा या ठिकाणी दर महाशिवरात्रीला पशुप्रदर्शन भरवत होते. तुम्ही मुख्यमंत्री होऊन परळीत आलात, याचा आगळा वेगळा आनंद आहे. महापशुधन एक्सपोच्या कार्यक्रमासाठी वडीलधारी नात्यानं मी पंकजाताईंचे कौतुक करतो. हे देवाभाऊ, महायुतीचे सरकार आहे. ज्याप्रमाणे वर महायुतीचे सरकार आहे, त्याचप्रमाणे परळी नगर परिषदेत आम्ही महायुतीतच निवडणूक लढवली आणि जिंकली. इतर ठिकाणी कशी निवडणूक झाली हे मला माहित नाही. आमच्या दृष्टीने तुम्हीच आमचे कामधेनू आहात. कामधेनु गाईसमोर कुठलीही इच्छा मागितली की ती पूर्ण होते. तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजनेसाठी आपण 100 कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात ठेवावी, अशी मागणी त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. थर्मलच्या जुन्या जागेवर साडेतीनशे सोलार मेगा वॅट सोलर प्रकल्प उभा करण्याची मागणी केली होती, त्यापैकी 50 मेगा वॅटची मागणी तुम्ही पूर्ण केली. केंद्राच्या प्रसाद योजनेत वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश करावा, अशी देखील मागणी त्यांनी केली.

Pankaja Munde: 24 लक्ष तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी आमच्याकडे योजना : पंकजा मुंडे

या कार्यक्रमात पंकजा मुंडे म्हणाल्या की, सदैव घड्याळाच्या काट्याप्रमाणे काम करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. मुख्यमंत्री साहेब मी तुमच्या आदेश पाळते. पण, युतीमध्ये असल्याने आज सगळ्यांचे नाव घेऊन भाषणाला सुरुवात केली आहे. मला ग्रामविकास आणि जलसंधारण खाते मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यांच्यामुळे जलयुक्त शिवार योजना राबवू शकले. आता मुख्यमंत्र्यांनी मला पशूसंवर्धन विभागाची जबाबदारी दिली आहे. त्यानंतर आम्ही पशुसंवर्धनाला कृषीचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न केले. याला मुख्यमंत्र्यांनी मंजूरी दिली. 24 लक्ष तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी आमच्याकडे योजना आहे. या माध्यमातून मोठे काम होऊ शकणार आहे. पशुसंवर्धन खाते मला मनापासून आवडले आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले.

आणखी वाचा

Dhananjay Munde: मनभेद विसरून सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी उभे राहूया; बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धनंजय मुंडेंची भावनिक साद, नेमकं काय म्हणाले?

आणखी वाचा

Comments are closed.