धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती; माणिकराव कोकाटेंचा राजीनामा कधी?

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. दबाव वाढल्यानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. विधानभवनमध्ये माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
धडधडीत पुरावे असतानाही फडणवीस खोटं बोलत असतील तर…, संजय राऊत यांनी फटकारले
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि माणिकराव कोकाटे यांच्या घोटाळ्यानंतर राज्यातील महायुती सरकारवर आणि दबाव वाढला. अखेर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे. आणि पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवलेला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे राजीनामा स्वीकारून मंत्री धनंजय मुंडे यांना पदमुक्त करण्यात आलेलं आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कोकाटेंचा राजीनामा कधी?
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं. महायुतीचे दोन-दोन गुंडे, कोकाटे-मुंडे! अशा घोषणा विधान भवनाबाहेर महाविकास आघाडीच्या आमदारांनी दिल्या. धनंजय मुंडे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
Comments are closed.