महादेव मुंडेंना धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून संपवलं, राजाभाऊ फड यांच्या आरोपावर मुंडे समर्थकां

धनंजय मुंडे: परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून (Mahadev Munde Case) सुरू झालेला राजकीय वाद आता अधिकच तीव्र होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राजाभाऊ फड (Rajabhau Phad) यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर मुंडे समर्थकांनी त्यावर जोरदार पलटवार केला आहे.

मुंडे समर्थकांनी फड यांच्या पत्रकार परिषदेला “बारामती व्हाया अंतरवाली मार्गे परळी” अशी उपरोधिक उपमा देत टीका केली. कोणताही कायदेशीर पुरावा नसताना केवळ राजकीय हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राजाभाऊ फड हे आमदार धनंजय मुंडे यांची बदनामी करत असल्याचा आरोप समर्थकांनी केला.

Dhananjay Munde: बारामतीतून फड यांना बोलायला लावले

याआधी मनोज जरांगे पाटील यांनी परळीशी संबंधित काही गौप्यस्फोट होणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चेला विराम लागल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. या सर्व घडामोडींनंतर बारामतीतून फड यांना बोलायला लावले जात असल्याचा थेट आरोप मुंडे समर्थकांनी केला.

Dhananjay Munde: …तर त्याचीही सखोल चौकशी करण्यात यावी

महादेव मुंडे प्रकरणात नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग चाचण्यांचे अहवाल लीक झाल्याची चर्चा सुरू आहे. जर खरोखरच या चाचण्यांचे अहवाल बाहेर आले असतील, तर त्याचीही सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुंडे समर्थकांनी केली. दरम्यान, स्वर्गीय महादेव मुंडे यांना न्याय मिळावा हीच भूमिका परळीकरांची तसेच आमदार धनंजय मुंडे यांची असल्याचे समर्थकांनी स्पष्ट केले.

Rajabhau Phad: काय म्हणाले होते राजाभाऊ फड?

दरम्यान, राजाभाऊ फड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महादेव मुंडे हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात धनंजय मुंडे यांना कलम 120 (ब) अंतर्गत आरोपी करण्याची मागणी त्यांनी केली. फड यांच्या मते, महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून पोलिसांना फोन गेल्याने तपास प्रक्रिया थांबवण्यात आली होती. त्याच वेळी योग्य तपास झाला असता तर पुढील काळात बापू आंधळे आणि संतोष देशमुख यांसारख्या हत्या घडल्या नसत्या, असा दावा त्यांनी केला.

याशिवाय, या प्रकरणात संशयितांवर करण्यात आलेल्या ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्टचे अहवाल तातडीने जाहीर करावेत, अशी मागणीही त्यांनी केली. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील खरे सूत्रधार अजूनही अटकेबाहेर असल्याचा आरोप करत 20 मार्चपर्यंत कारवाई झाली नाही, तर शरद पवार गटाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही फड यांनी दिला आहे. धनंजय मुंडे यांनी आजवर परळीतील 10 लोकांना संपवले आहे, असा खळबळजनक दावा देखील त्यांनी केला. या सर्व आरोप-प्रत्यारोपांमुळे परळीतील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

आणखी वाचा

Shinde Samiti: शिंदे समितीचा धडाका; राज्यात आतापर्यंत 48 लाख कुणबी नोंदी आढळल्या, ‘इतक्या’ मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र प्रदान, मंत्रिमंडळ बैठकीत माहिती समोर

आणखी वाचा

Comments are closed.