एस.टी.आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचे सहकार मंत्र्यांच्या घरासमोर ढोल बजावो आंदोलन

चाकूर तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या घरासमोर धनगर समाज बांधवांच्या वतीने एस. टी.आरक्षण अंमलबजावणीसाठी ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले. यावेळी झरी, राचन्नावाडी, चाकूर,खुर्दळी,आजनसोंडा, कलकोटी,शिरनाळ,चापोली, धनगरवाडी,उंबरगा,नागेशवाडी,सांडोळ, आनंदवाडी, हिंपळनेर, हानमंत जवळगा,जढाळा आदी गावातील समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते.

आंदोलकांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना विधान सभेमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीची अंमलबजावणी करण्यासाठी मागणी करावी अशी विनंती केली.त्याच बरोबर आम्हाला आदिवासीचे सात टक्के आरक्षण नको असून आम्हाला एन.टी.सी.चे साडेतीन टक्के आरक्षण आहे.तेच एस.टी.बी.म्हणून स्वतंत्रपणे आरक्षण द्यावे.आदिवासींच्या यादीमध्ये ३६ नंबरवर धनगर किंवा धनगड म्हणजेच महाराष्ट्रातील धनगर आहेत.याला मान्यता द्यावी धनगर समाजासाठी सुरू केलेल्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्या जाव्यात अशी मागणी आंदोलकांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या कडे केली आहे.

आपण केलेल्या सर्व मागण्या मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या कडे पाठपुरावा करून धनगर समाजास न्याय देण्याची विनंती करणार असल्याचे पत्र देऊन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आंदोलकांना आश्वासन दिले. यावेळी या आंदोलनात दयानंद सुरवसे,सुरेश हाके,गंगाधर केराळे, लहुजी कोरे, सुरेश शेवाळे, नारायण काचे,तानाजी वागलगावे, ज्ञानेश्वर गाडेकर,तुळशीराम काचे,खंडू शेवाळे,बाळू हाके, ज्ञानोबा हांडे,बाळू कामाळे, भुजंग सुरवसे,कांतराव सुरवसे, शिवाजी पाटील, रामदास सुरवसे,धोंडीराम मुदाळे, गोविंद सुरवसे, धोंडीराम मुदाळे,शंकर तिवडे,प्रशांत सुरवसे,अजीत पाडुळे, गणपती डोंगरे, मारोती तिवडे, परमेश्वर पिसे, सोमनाथ पोटफळे, कृष्णा कामाळे,गिरजाप्पा इडूरे,महेश वागलगावे, ज्ञानेश्वर सुरवसे, नंदकुमार पाटील, भानुदास वागलगावे, बालाजी मलीशे,बाबू वागलगावे, दयानंद मुर्के, बळीराम भिंगोले,विठ्ठल उदगिरे, हाणमंत कुमठकर, बालाजी सूर्यवंशी, लिंबराज केसाळे, सुनिल केसाळे, चंद्रकांत एनकफळे,लखन नेवाळे, काशिनाथ पाटील आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.