मुलाला काही झालं तर आम्ही आत्महत्या करणार, आईचा आक्रोश, प्रेम प्रकरणातून तरुणाला अमानुष मारहाण

धारशिव गुन्हेगारीच्या बातम्या: प्रेम प्रकरणातून अमानुष पद्धतीने मारहाण झालेल्या धाराशिव (Dharashiv ) येथील तरुणाची मृत्यूची झुंज सुरु आहे. मारहाण झाल्यापासून तरुण शुद्धीवर नसल्याची माहिती आई-वडिलांनी दिली आहे. सोलापुरातील (Solapur) खासगी रुग्णालयात आठ दिवसांपासून अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. एकुलत्या एका मुलाचं काही बरं वाईट झालं तर आत्महत्या करु असे म्हणत आईनं आक्रोश केला आहे. आरोपींना तात्काळ अटक करत फाशीची शिक्षा देण्याची मागणीही केली आहे.

सात ते आठ जणांच्या टोळक्याकडून मारहाण

धाराशिव जिल्ह्यातील भूम इथे 18 वर्षीय तरुणाला लोखंडी रोड, काठीने अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली होती. मारहाणीनंतर तरुणाला मृत समजून भूम तालुक्यातील पांढरेवाडी शिवारात विवस्त्र अवस्थेत फेकून देण्यात आलं होतं. रॉड, काठीने सात ते आठ जणांच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आली होती. पाठीपासून तळपायापर्यंत बेदम मारहाण करण्यात आली होती. गुप्तांगालाही तीक्ष्ण वस्तूने इजा केल्याची माहिती देण्यात आली आहे. तरुण मृत झाल्याचे समजून रस्त्यालगत विवस्त्र अवस्थेत फेकून दिले होते.

मुख्य आरोपी सतीश जगतापसह सात जणांविरोधात अंबी पोलिसात गुन्हा दाखल

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाची मृत्यूशी झुंज सुरु आहे. मुख्य आरोपी सतीश जगतापसह सात जणांविरोधात अंबी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर इतर आरोपी फरार आहेत. प्रेम प्रकरणातून मारहाण झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

मृत समजून विवस्त्र अवस्थेत दिले फेकून

याबाबत अधिक माहिती अशी की, माऊली गिरी नावाचा तरुण घरी एकटा असताना त्याला सात ते आठ जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉड अन् काठीने अमानुष मारहाण करण्यात आली. प्रेम प्रकरणातून ही मारहाण झाल्याची चर्चा आहे. मारहाणीनंतर तरुणाला मृत समजून भूम तालुक्यातील पांढरेवाडी शिवारात विवस्त्र अवस्थेत फेकून देण्यात आले. तरुणाला पाठीपासून तळपायापर्यंत बेदम मारहाण झाली आहे. त्याच्या गुप्तांगालाही तीक्ष्ण वस्तूने इजा केल्याची माहिती समोर येत आहे. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाची सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे. या प्रकरणात सतीश जगताप याच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तीन जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.  मात्र ज्या पद्धतीने ही अमानुष मारहाण करण्यात आली. त्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Dharashiv Crime : धाराशिवमध्ये संतोष देशमुख प्रकरणासारखीच संतापजनक घटना, 18 वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड, काठीनं अमानुष मारहाण, मृत समजून विवस्त्र अवस्थेत दिलं फेकून

अधिक पाहा..

Comments are closed.