धाराशीव महापुराच्या मगरमिठीत असताना जिल्हाधिकारी नाचगाण्यात दंग; व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांची सडकून टीका

मराठवाड्यावर आभाळ कोसळले असून बीड, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले आहे. धाराशीवमधील अनेक तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झालेली असून शेतकरी अडचणीत आलेला आहे. एकीकडे जिल्ह्यात अस्मानी संकट असताना दुसरीकडे जिल्हाधिकारी मात्र नाचगाण्यात मग्न असल्याचे समोर आले आहे.

धाराशीवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा नाचगाण्यात मग्न असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जिल्ह्यातील नागरिक अतिवृष्टी आणि पूर अशा संकटात असताना जिल्हाधिकारी तुळजापूरमध्ये एका कार्यक्रमात नाचत होते. 24 सप्टेंबर रोजीचा हा व्हिडीओ आता व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी जिल्हाधिकारी पुजार यांच्यावर सडकून टीका केली आहे. जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झालेली असताना आणि शेतकरी अडचणीत असताना जिल्हाधिकाऱ्यांना असे बेजबाबदार वर्तन शोभत नाही, अशी खरडपट्टी नेटकऱ्यांनी काढली.

Comments are closed.