धाराशिवमध्ये महायुतीत पुन्हा संघर्ष, सरनाईकांच्या आदेशाने 117 कोटींच्या रस्ते कामाला स्थगिती
धाराशिव: धाराशिवमध्ये (Dharashiv ) पालकमंत्री प्रताप सरनाईक ( Guardian Minister Pratap Sarnaik) आणि भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील (Rana Jagjitsinh Patil) यांच्यात पुन्हा संघर्ष सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. धाराशिव शहरातील 117 कोटींच्या रस्ते कामाच्या कार्यारंभ आदेशाला नगरविकास विभागाकडून स्थगिती देण्यात आली आहे. नगरविकास विभागाकडून धाराशिव नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना स्थगितीच पत्र देण्यात आलं आहे. तक्रारीचा चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या तक्रारीमुळे स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
दोनच दिवसांपूर्वी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी 117 कोटीच्या कामांना कार्यारंभ आदेश मिळाल्याच श्रेय घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्र्यांच्या असे भूमिपूजन होणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र दोनच दिवसात 117 कोटींच्या रस्ते कामाच्या कार्यारंभ आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. यापूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरूनही घडलं स्थगिती नाट्य घडलं होतं. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा महायुतीत संघर्षाचा नवा अंक समोर आला आहे.
धाराशिव शहरातील रस्ते कामाला निधी मंजूर झाल्यानंतर राणा पाटील समर्थकाकडून बॅनरबाजी करण्यात आली होती. धन्यवाद देवा भाऊ धन्यवाद राणा दादा म्हणत सोशल मीडियावर पोस्ट वायरल झाली होती. मात्र दोनच दिवसात कार्यारंभ आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. मंजुरी मिळाल्यानंतर प्रेस घेऊन राणा पाटील यांनी भूमिका मांडली होती.
आणखी वाचा
Comments are closed.