प्रचाराच्या अंतिम टप्प्यात परंड्यात ‘अंधश्रद्धा’चा खेळ; उमेदवारासह समर्थक नेत्यांच्या फोटोला सु


धाराशिव वृत्त सीमा: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला नगरपलिका (Nagarpalika Election 2025) आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या (Nagarpanchayat Election 2025) प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. आज रात्री 10 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच बड्या नेत्यांच्या आज सभा पार पडणार आहेत. मात्र याआधी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

प्रचाराच्या अंतिम टप्प्यात धाराशिवमधील परंड्यात ‘अंधश्रद्धा’चा खेळ सुरु आहे. जनशक्ती नगरविकास आघाडीच्या उमेदवारासह समर्थक नेत्यांच्या फोटोला सुई, दाभण टोचण करून काळ्या कपड्यांमध्ये बांधून ठेवल्याचे समोर आले आहे. या प्रकारावर आमच्या फोटोला कितीही सुई टोचल्या तरी काहीही फरक पडणार नाही. जनता तुमच्या त्रासाला कंटाळलीय, असं अशी टीका ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रणजीत पाटील यांनी केली आहे.

नेमकं प्रकरण काय? (Dharashiv News)

परंडा नगरपरिषदेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच, जादूटोण्याचा एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील एका प्रार्थनास्थळात प्रमुख उमेदवारांच्या छायाचित्रांचा वापर करून जादूटोणा करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. जनशक्ती नगरविकास आघाडीच्या उमेदवारासह समर्थक नेत्यांच्या फोटोला सुई, दाभण टोचण करून काळ्या कपड्यांमध्ये बांधून ठेवले होते. कितीही सुया टोचल्या तरी फरक पडणार नाही. जनता तुमच्या त्रासाला कंटाळली असल्याची टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली. त्यावर ठरवून केलेल्या माणसाला याची माहिती असते, याची चौकशी करा अशी मागणी परंडा नगरपरिषदेत शिवसेनेचे उमेदवार जाकीर सौदागर यांनी केली. परांडा पालिकेच्या निवडणुकीत शिंदे सेना आणि जनशक्ती नगरविकास आघाडी यांच्यात थेट लढत आहे. गेल्या काही दिवसांपासून विकासाच्या मुद्द्यांवर जोरदार प्रचार सुरू होता. मात्र, जादूटोण्याचा हा प्रकार रविवारी उघडकीस आला. या प्रकाराबद्दल अद्यापपर्यंत कोणीही अधिकृत तक्रार दाखल केली नाही.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Nagarpalika Nagarpanchayat Election 2025 Postponed: नगराध्यक्षपदाच्या 22 अन् 700 हून अधिक नगरसेवकपदाच्या निवडणुकाही पुढे; निवडणूक आयोगाचा सुधारित कार्यक्रम जाहीर, आदेशात नेमकं काय काय म्हटलंय?

आणखी वाचा

Comments are closed.