धाराशिवमध्ये शरद पवार गटाला धक्का, जिल्हाध्यक्ष दुधगावकरांनी दिला राजीनामा, काय घेणार भूमिका?


धाराशिव राजकारण बातम्या: धाराशिव जिल्ह्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पवार गटाचे धाराशिवचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. दुधगावकर यांनी जिल्हाध्यक्ष पदासह सक्रीय सदस्य व प्राथमिक सदस्यपदाचा देखील राजीनामा दिला आहे. दुधगावकर यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते संजय निंबाळकर यांनीही सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

राजीनाम्यानंतर दुधगावकर नेमका कोणता राजकीय निर्णय घेणार ?

दरम्यान, संजय पाटील निंबाळकरांनी 2019 मध्ये राष्ट्रवादीकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. संजय पाटील निंबाळकरांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना राजीनामा पाठवला आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावरच राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे.  राजीनामा देण्याचे कारण अस्पष्ट आहे. दरम्यान, आता राजीनाम्यानंतर दुधगावकर नेमका कोणता राजकीय निर्णय घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय पाटील निंबाळकरांचा राजीनामा

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय पाटील निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शऱद पवार गटाचा दिलेला राजीनामा महत्वाचा मानला जात आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळं शरद पवार गटाला धाराशिवमध्ये जोरदार धक्का बसला आहे. दरम्यान, संजय पाटील निंबाळकर हे नेमकं कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र, त्यांच्या पक्ष सोडण्याचा मोढठा परिणाम धाराशिव जिल्ह्यामध्ये शरद पवार गटावर होऊ शकतो. कालच निवडणूक आयोगाने नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. 2 डिसेंबर रोजी यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 3 डिसेंबर रोजी या निवडणुकांचे निकाल लागणार आहे. मात्र, त्यापूर्वीच अनेक ठिकाणी पक्ष प्रवेश होताना दिसत आहेत. राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

रत्नागिरीचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दिला राजीनामा

रत्नागिरीचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी देखील जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. चिपळूण मधील भाजपच्या कार्यक्रमात त्यांनी राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाचा दिला राजीनामा सादर केला आहे. राजेश सावंत यांच्याकडे दक्षिण रत्नागिरीचा जबाबदारी होती. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्याचे कारण गुलदस्त्यात आहे. मात्र ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या राजीनाम्यामुळे खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Phaltan Doctor death: महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते तेव्हा मुख्यमंत्री हात वर करतात, त्यांनी राजीनामा द्यावा; प्रणिती शिंदे कडाडल्या

आणखी वाचा

Comments are closed.