Dharmarao Baba Atram’s statement on contesting on his own in Gadchiroli during the local body elections
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकत्रित निवडणुका लढवण्याचं सांगितलं असलं तरी स्थानिक पातळीवर मात्र नेते मंडळी वेगळा निर्णय घेताना दिसत आहे. विदर्भातील आदिवासी समाजाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मराव बाबा अत्राम यांनी भाजपावर गंभीर आरोप करत एकला चलो रेचा नारा दिला आहे.
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबतची अधिसूचना येत्या चार आठवड्यात काढावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकत्रित निवडणुका लढवण्याचं सांगितलं असलं तरी स्थानिक पातळीवर मात्र नेते मंडळी वेगळा निर्णय घेताना दिसत आहे. विदर्भातील आदिवासी समाजाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मराव बाबा अत्राम यांनी भाजपावर गंभीर आरोप करत एकला चलो रेचा नारा दिला आहे. (Dharmarao Baba Atram’s statement on contesting on his own in Gadchiroli during the local body elections)
नागपूर येथे आज (23 मे) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विदर्भस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात षडयंत्र रचलं गेलं. माझ्या विरोधात निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवाराला भाजपा आणि काँग्रेसकडून पैसे पुरवले गेले. पण तरी देखील मी निवडून आलो. यानंतर आता स्थानिक स्वराज्य स्थंस्थेच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणुकीत दुसऱ्या पक्षाकडे जागेची भीक मागायची नाही. कोणाच्या कुबड्या घेऊन चालायचे नाही. गडचिरोली जिल्ह्यात आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. मी कोणाचेही ऐकणार नाही. पक्ष आमच्यासोबत असेल, गडचिरोलीत स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सत्ता आणली जाईल, अशी भूमिका धर्माबाबा आत्राम यांनी मांडली. त्यांच्या वक्तव्यानंतर महायुतीत दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – Vaishnavi Hagawane Death : वैष्णवी आत्महत्या प्रकरणावरून खडसे – चाकणकरांमध्ये जुंपली
स्थानिक स्तरावर वेगळा निर्णय
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, ही निवडणूक महयुती एकत्रित लढेल. परंतु एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय स्थानिक स्तरावर होऊ शकतो. असे असले तरी धोरण म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. मात्र स्थानिक पातळीवर महायुतीमधील नेते मंडळी वेगळा निर्णय घेताना दिसत आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वाद होण्याची शंका नाकारता येत नाही.
हेही वाचा – Sanjay Raut : पोलीस राजकारण्यांच्या दबावात, त्या प्रकरणांवरून संजय राऊतांची टीका
Comments are closed.