पालिका शाळेचा विद्यार्थी क्षितिज वाघमारेची सोनेरी कामगिरी

माटुंगा येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एल. के. वाघजी आंतरराष्ट्रीय केंब्रिज शाळेचा विद्यार्थी क्षितिज वाघमारेने धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये झालेल्या स्पर्धेत तायक्वांदोत सुवर्णपदक पटकावले. आंतरराष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या 9 ते 11 वर्षे वयोगटातील तसेच 21 ते 23 वजनी गटातील खेळाडूंच्या गटात सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत क्षितिजने हे सुवर्णपदक जिंकले आहे. आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा संघटनेतर्फे या स्पर्धेचे आयोजन नुकतेच मुंबईमध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये राजस्थान, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील नामांकित शाळांनी भाग घेतला होता. मुंबईतील आंतरराष्ट्रीय मंडळांच्या सर्व शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये केंब्रिज शाळेच्या क्षितिज वाघमारेने क्रेसमाँडे आंतरराष्ट्रीय शाळेतील आर्यव जैनवर सहज मात करत व 14-0 ने आघाडी घेत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

Comments are closed.