IPL मधील वादग्रस्त क्षणावर धोनीचा मोठा खुलासा, 6 वर्षांनी मान्य केली आपली चूक!

आयपीएल 2019 मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संघ समोरासमोर होते. दोन्ही संघात सामना जयपुरमध्ये खेळला जात होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स संघाला शेवटच्या षटकात 18 धावा पाहिजे होत्या. पण त्यावेळी अंपायरने दिलेला नो- बॉलचा निर्णय बदलण्यासाठी महेंद्रसिंग धोनी मैदानात उतरला. त्यानंतर त्याला त्याची योग्य ती किंमत भरावी लागली. तसेच तेव्हा वादही झाला होता. आता महेंद्रसिंग धोनीने तब्बल सहा वर्षानंतर या घटनेला त्याची खूप मोठी चूक मानले आहे.

तब्बल सहा वर्षानंतर धोनीने एका कार्यक्रमांमध्ये बोलताना या घटनेची आठवण काढली तो म्हणाला की, हे आयपीएलच्या एका सामनामध्ये घडले होते, जेव्हा मी मैदानावर गेलो होतो आणि एक मोठी चूक केली होती. पुढे तो म्हणाला की, असे खूप प्रसंग आले आहेत जिथे काही गोष्टी तुम्हाला भडकवून देतात. तुमच्याकडून प्रत्येक सामन्यात चाहते जिंकण्याची आशा करतात. तेव्हा तुम्हाला खूप गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. तसेच तो म्हणाला की जेव्हा तुम्ही रागात असता किंवा निराशेत असता,तेव्हा तुम्ही शांत राहणे खूप महत्त्वाचे आणि योग्य असते.

कार्यक्रमांमध्ये पुढे बोलताना महेंद्रसिंग धोनी म्हणाला की, काही वेळासाठी त्या गोष्टी डोक्यातून काढून टाकायच्या आणि मोठा श्वास घेऊन शांत राहायचे. जर तुम्ही त्या गोष्टींमध्ये अडकून राहिला तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. तसेच तुमच्या भावनांना निर्णय घेण्यासाठी प्रभावित करू नका. महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.

Comments are closed.