‘एमएस धोनी पाठीवर वार करणारा’, ‘या’ माजी भारतीय खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ निर्माण!
एमएस धोनीवर (MS Dhoni) कायम टीका करणारे माजी भारतीय क्रिकेटपटू आणि युवराज सिंह यांचे वडील योगराज सिंह (Yuvraj Singh’s Father Yograj singh) यांचे एक विधान सध्या चर्चेत आले आहे. त्यांनी धोनीसह अनेक भारतीय खेळाडूंवर गंभीर आरोप केले आहेत. योगराज सिंह यांनी धोनी आणि इतर भारतीय खेळाडूंना पाठीत छुरा खुपसणारे म्हणजे पाठीवर वार करणारे असे संबोधले आहे. त्यांच्या मते, युवराज सिंगसोबत भारतीय संघात अन्याय झाला. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सोडले तर संघात युवराजचा खरा मित्र कुणीच नव्हता.
योगराज सिंह म्हणाले, जसे मी आधी सांगितले, यश, पैसा आणि शोहरतीच्या दुनियेत कुणाचाही खरा मित्र नसतो. कायम पीठात छुरा खुपसणारे लोक असतात, जे तुम्हाला खाली खेचू इच्छितात. लोक युवराज सिंगला घाबरत होते कारण त्यांना वाटायचं तो त्यांची जागा घेईल. कारण युवराज हा देवाने दिलेला महान खेळाडू होता. तो सर्वात मोठ्या खेळाडूंमध्ये एक आहे आणि त्याच्यामुळे एमएस धोनीपासून सगळेच घाबरायचे.
हे पहिल्यांदा नाही की योगराज यांनी धोनी आणि इतर भारतीय खेळाडूंवर टीका केली आहे. ते नेहमीच असे वादग्रस्त विधान करत आले आहेत. त्यांचे असेही मत आहे की युवराज सिंगला वेळेआधीच निवृत्ती घ्यायला भाग पाडले गेले.
युवराजने मात्र दीर्घकाळ भारतीय संघासाठी खेळ केले. त्याने 2000 ते 2017 या काळात भारताचे प्रतिनिधित्व केले. भारतासाठी खेळलेल्या 402 सामन्यांत त्याने 35.05 च्या सरासरीने 11,178 धावा केल्या, ज्यामध्ये 17 शतकं आणि 71 अर्धशतकं आहेत. वनडे वर्ल्ड कप 2011 मध्ये युवराज प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ठरला होता. त्याने त्या स्पर्धेत 1 शतक आणि 4 अर्धशतकांच्या जोरावर 362 धावा केल्या तसेच 15 खेळाडू देखील बाद केले.
Comments are closed.