धुळे हादरलं, माजी स्थायी समिती सभापतींच्या मुलानं आयुष्य संपवलं, वाढदिवस साजरा केला अन् दोनच दि

धुले गुन्हा: धुळे शहरातील स्नेहनगर परिसरात एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती सभापती सोनल शिंदे (Sonal Shinde) यांचा मुलगा विराज शिंदे (Viraj Shinde) याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (11 सप्टेंबर) रात्री उशिरा उघडकीस आली असून, शहरात एकच खळबळ उडाली आहे. (Dhule Crime News)

विशेष म्हणजे मंगळवारीच (9 सप्टेंबर) विराजचा वाढदिवस कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत आनंदात साजरा करण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच त्याच्या अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गळफास घेऊन संपवले आयुष्य

प्राथमिक माहितीनुसार, आत्महत्येच्या दिवशी विराज घरी एकटाच होता. कुटुंबीय बाहेर गेले असताना त्याने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. काही वेळानंतर कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ विराजला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याचा मृत्यू आधीच झाल्याचे घोषित केले.

पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

सध्या विराजने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनेचा अधिक तपास सुरू केला असून, आत्महत्येच्या कारणाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, विराज शिंदेच्या आत्महत्येने धुळ्यात एकच खळबळ उडाली आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

इतर महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime Bandu Andekar: बंडू आंदेकरच्या घरावर पोलिसांची धाड, सापडलं कोट्यवधींचं घबाड, साठेखत, दागिने अन् पॉवर ऑफ ॲटर्नी…

Jalgaon Crime: लग्नात सासरच्यांनी मोठा हॉल मागितला, जेवणात गुलाबजाम अन् 10 लाख दिले, पण चार महिन्यांत मयुरीने आयुष्य संपवलं

आणखी वाचा

Comments are closed.