10 ते 12 जणांनी केली तरुणाला बेदम मारहाण, उपचारदरम्यान मृत्यू, धक्कादायक घटनेनं धुळे हादरलं
धुळे क्राईम न्यूज : धुळे तालुक्यातील वेल्हाने इथं एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाची निर्घुण खून झाल्याची घटना घडली आहे. विकास श्रावण महाले वय 28 असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. वेल्हाने गावातील ग्रामपंचायती समोर 10 ते 12 तरुणांनी रात्रीच्या सुमारास बेदम मारहाण केली होती. जखमी अवस्थेत तरुणाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यावेळी उपचारदरम्यान महाले यांचा मृत्यू झाला आहे. .
लोखंडी रोडसह लाठ्या काठ्यांनी हल्ला
लोखंडी रोडसह लाठ्या काठ्यांनी हल्ला करत तरुणाला बेदम मारहाण केली होती. तीन महिन्यापूर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढून हा वाद उफळला होता. गावातीलच तरुणांनी खून केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. काही संशयीत आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, मारहाण करण्यासाठी एकूण 10 ते 12 जण होते. या सर्वांनी विकास श्रावण महाले यांना बेदम मारहाण केली. त्यामुळं त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.
एका मुलीच्या छेडछाडनंतर डाचकुल पाडा परिसरात दोन गटांमध्ये झटापट, 25 पेक्षा जास्त रिक्षांची तोडफोड
मीरा-भाईंदरमधील काशीमिरा परिसरातील डाचकुल पाडा येथे काल रात्री दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाल्यानंतर आज सकाळी काही जणांकडून मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ऑटो रिक्षांच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच काशिमीरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार काही व्यक्ती हातात दांडके, लोखंडी सळया आणि दगड घेऊन आले होते व त्यांनी रिक्षांच्या काचा फोडल्या. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन उपद्रव माजविणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेची माहिती मिळताच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घटनास्थळी पोहचून स्वतः नागरिकांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेतली व दोषींवर कारवाई करण्यासाठी सांगितले. तसेच या परिसरात अमली पदार्थ विक्री होते त्यावर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश दिले.सध्या पोलिसांनी डाचकुल पाडा परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Crime News: छ. संभाजीनगरमध्ये वैयक्तिक वादातून तरूणाला संपवण्याचा प्रयत्न; एकाच कुटुंबातील सदस्यांनी मध्यरात्री रस्त्यात अडवलं, डोकं जमीनीवर आपटलं अन् चाकू, तलवारीने हल्ला
आणखी वाचा
Comments are closed.