Dhule police arrested four illegal bangladeshi migrants
महाराष्ट्रातील धुळे येथून चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. धुळे पोलीस आणि एटीएसने संयुक्तरित्या ही कारवाई केली.
धुळे : बांगलादेशसोबत सध्या भारताचे संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. अशातच सध्या देशात बेकायदेशीररित्या घुसखोरी करून वास्तव्याला असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात सरकार कारवाई करते आहे. उत्तर प्रदेश, आसाम, उत्तराखंड, दिल्लीसह अनेक ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. आता महाराष्ट्रातील धुळे येथून चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. धुळे पोलीस आणि एटीएसने संयुक्तरित्या ही कारवाई केली. (dhule police arrested four illegal bangladeshi migrants)
धुळे पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या चारही नागरिकांकडी आधार कार्ड ओरिजनल आहे. तसेच त्यांच्याकडून 40 हजारांचे 4 मोबाइल फोन देखील जप्त केले आहेत. या चार बांगलादेशी नागरिकांमध्ये 3 महिला आणि एक पुरूष आहे. या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
– Advertisement –
हेही वाचा – Nitin Gadkari Apology : जेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरकरांची माफी मागतात तेव्हा…काय आहे प्रकरण?
मोहम्मद शेख (48), इरफान रफिक शेख (30), शिल्पी शेख (43) आणि ब्युटी बेगम शेख (45), अशी या बांगलादेशी घुसखोरांची नावे आहेत. ते चौघेही बांगलादेशातील महिदीपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
– Advertisement –
धुळे शहरातील न्यू शेरे पंजाब लॉजमध्ये ते वास्तव्याला होते. पोलिसांना यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही बांगलादेशी कामाच्या शोधात भारतात आले होते आणि कायमस्वरूपी इथेच राहण्याचा त्यांचा विचार होता.
दरम्यान, धुळ्यातील कारवाईपूर्वी ठाण्यातील भिवंडी येथे बेकायदेशीररित्या रहात असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या दोघांकडे भारतात राहण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर कागदपत्रे नव्हती. त्यामुळे या दोघांविरोधात परदेशी नागरिक तसेच भारतीय पासपोर्ट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (dhule police arrested four illegal bangladeshi migrants)
हेही वाचा – Santosh Deshmukh Murder : वाल्मिक कराडवर एकट्या परळीत 23 गुन्हे तरीही मोकाटच…दमानिया आक्रमक
Edited by : Ashwini A. Bhatavdekar
Comments are closed.