3 हजार कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला धुरंधर
गेल्या काही महिन्यांपासून सिनेसृष्टीमध्ये एकाच चित्रपटाची चर्चा आहे. तो चित्रपट म्हणजे ‘धुरंधर.’ ‘धुरंधर’चे दोन भाग प्रदर्शित झाले. दोन्ही भागांनी जगभरात धमाल केली असून तीन हजार कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा पार केला आहे. हा आकडा पार करणारी ही पहिली हिंदुस्थानी चित्रपटांची मालिका ठरली आहे. ‘धुरंधर-2’ने जगभरात 1.718.62 कोटी रुपयांची तर ‘धुरंधर-1’ने 1.307 कोटी रुपयांची कमाई केली. ‘पुष्पा’च्या दोन्ही भागांनी 2,192 कोटींची कमाई केली होती. ‘बाहुबली’च्या दोन्ही भागांनी मिळून 2.438 कोटींचा व्यवसाय केला होता. रणवीर सिंह आणि अक्षय खन्ना यांच्या भूमिकांनी चित्रपटात भाव खाल्ला आहे. दोघांच्या अभिनयाचे सर्वत्र काwतुक करण्यात येत आहे.
Comments are closed.