‘धुरंधर-2’ एक हजार कोटींच्या क्लबमध्ये

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रणवीर सिंहची प्रमुख भूमिका असलेला ‘धुरंधर ः द रिवेंज’ हा चित्रपट अवघ्या सात दिवसात 1 हजार कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे. सर्वात वेगाने 1 हजार कोटी रुपये कमवण्याच्या रेकॉर्डमध्ये या चित्रपटाने ‘पुष्पा-2’ची बरोबरी साधली आहे. ‘धुरंधर’ने जगभरात 1006.50 कोटी रुपये कमावले आहेत. ‘धुरंधर-2’चे हिंदुस्थानात एकूण नेट कलेक्शन 623.42 कोटी रुपये आहे. तर परदेशात या चित्रपटाने 261.92 कोटी रुपये कमावले आहेत. ‘धुरंधर-2’ने पेड प्रिह्यू शोमधून 43 कोटी, पहिल्या दिवशी 102.55 कोटी, दुसऱ्या दिवशी 80.72 कोटी, तिसऱ्या दिवशी 113 कोटी, चौथ्या दिवशी 114.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Comments are closed.