धुरंधर 2 मुळे पाकड्यांचा तिळपापड, चित्रपटातील पात्रांनी चोळले जखमेवर मीठ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

धुरंधर २ चित्रपटाने दररोज बॉक्स ऑफिसचे नवनवीन विक्रम मोडीत काढले आहेत. या चित्रपटाने जागतिक स्तरावर देखील चांगली कमाई केली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर राकेश बेदीच्या ‘जमील जमाली’ या पात्राची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. या पात्रामुळे पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

पहिल्या भागानंतर, पाकिस्तानी नेते नबील गबोल यांनी दावा केला होता की, जमीलची भूमिका त्यांच्यापासून प्रेरित होती. हा दावा करून त्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, ‘धुरंधर २’ प्रदर्शित झाल्यानंतर त्यांचा सूर बदलला आहे.

नबील गबोल यांनी नाराजी व्यक्त केली. ‘धुरंधर २’ मध्ये जमीलला ‘रॉ’ एजंट म्हणून दाखवल्यामुळे ते निर्मात्यांवर जोरदार टीका करत आहेत. तेव्हापासून नबील पडद्याआड राहत आहेत. आता एका नवीन मुलाखतीत नबील यांनी ‘धुरंधर’च्या निर्मात्यांवर निशाणा साधला आहे. नबील यांनी या चित्रपटाला कचरा म्हटले असून, त्यात लयारीच्या संस्कृतीचे चुकीचे चित्रण केले असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “मी जमील जमालीच्या भूमिकेवर अजिबात खूश नाही.” आमच्या लयारीमध्ये डिस्को दिसतील अशी संस्कृती नाही. लयारीमध्ये एकही बलुच पंजाबी बोलत नाही. चित्रपटात जमील जमाली पंजाबीमध्ये बोलत होता. लयारीच्या संस्कृतीत माझी एक महत्त्वाची भूमिका होती. मी लयारीच्या राजकारणातील एका कणखर वृत्तीच्या शक्तिशाली नेत्याची भूमिका साकारली होती. पण चित्रपटात जमीलला एक खुशामतखोर म्हणून दाखवले आहे.

नबीलने अक्षय खन्नाने साकारलेल्या रहमान डकैतबद्दलही सांगितले. तो म्हणतो, “अब्दुल रहमानचे पात्र चित्रपटात जसे दाखवले आहे तसे नाही. मी त्याला जवळून ओळखत होतो. त्या काळी, जेव्हा अब्दुल रहमान आसपास असायचा, तेव्हा आम्ही रात्रभर एकत्र बसायचो, रात्रभर गप्पा मारायचो. तेव्हा दहशत नव्हती. हे अब्दुल रहमाननंतर सुरू झाले. अब्दुल रहमाननंतर टोळीयुद्ध सुरू झाले. अब्दुल रहमानला शांतता हवी होती.

नबील आणि पाकिस्तानी जनता ‘धुरंधर २’ बद्दल नाराजी व्यक्त करत असली, तरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आधीच प्रचंड यशस्वी ठरला आहे.

Comments are closed.