‘धुरंधर 2’ पहिल्यापेक्षा आणखी वादळी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अभिनेता रणवीर सिंहच्या ब्लॉकबस्टर ‘धुरंधर’च्या जबरदस्त यशानंतर आता ‘धुरंधर 2’ची प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली आहे. ‘धुरंधर 2’ येत्या 19 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘धुरंधर’मधील त्याचा लूक आणि ऍक्शन प्रेक्षकांना भावला होता. सिक्वेलमध्ये त्याचा आणखी अवतार आणखी आक्रमक असेल असे सांगण्यात आले आहे.

रणवीर साकारणारा हमजा अली मजारी हा हिंदुस्थानी गुप्तहेर पाकिस्तानमध्ये गेलेला दाखवण्यात आला होता. दुसऱ्या भागात त्याची खरी ओळख आणि मिशन अधिक स्पष्टपणे उलगडणार आहे. पहिल्या भागाने बॉक्स ऑफिस आणि ओटीटीवर धुमाकूळ घातला. ‘धुरंधर 2’मध्ये आणखी मोठा ऍक्शन दृश्ये आणि धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळतील, अशी चर्चा आहे.

Comments are closed.