‘धुरंधर -2’ मुळे बाॅलीवूड हादरलं, निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलल्या
Dhurandhar: The Revenge (धुरंधर 2) या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे बॉक्स ऑफिसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या मोठ्या बजेटच्या ॲक्शन-स्पाय चित्रपटामुळे अनेक निर्मात्यांनी आपले चित्रपट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट 19 मार्चला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला हिंदुस्थानसह परदेशात मोठ्या प्रमाणावर स्क्रीन मिळणार असल्यामुळे अनेक निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तारखा बदलल्या आहेत.
यामध्ये सर्वात महत्त्वाचा टाॅक्सिक हा यशचा चित्रपट देखील आता पुढे ढकलण्यात आला आहे. हा चित्रपट आधी 19 मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु ‘धुरंधर 2’शी थेट टक्कर टाळण्यासाठी आणि मध्यपूर्वेतील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर परिणाम होऊ शकतो या कारणाने चित्रपट जून महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आला. धुरंधरच्या त्सुनामीमध्ये आलीया भट्टचा ‘अल्फा’ हा सिनेमा देखील पुढे ढकलण्यात आलेला आहे. त्यामुळे आता आलियाचा अल्फा हा सिनेमा जुलैमध्ये पुढे ढकलला गेला आहे.
अदिवी शेष आणि मृणाल ठाकुरचा Dacoit: एक प्रेमकथा हा चित्रपटदेखील 19 मार्चच्या आसपास रिलीज होणार होता. मात्र ‘धुरंधर 2’ला मोठ्या प्रमाणावर स्क्रीन मिळणार असल्याने या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख बदलली आहे.
धुरंधर मुळे ‘धमाल-4’ हा चित्रपट आधी ईदच्या आसपास प्रदर्शित होणार होता. हा चित्रपट आता जुलैमध्ये प्रदर्शित होणार आहे.
धुरंधर 2’ला जगभरात १०,००० पेक्षा जास्त स्क्रीनवर रिलीज करण्याची तयारी सुरू आहे, त्यामुळे हा चित्रपट वर्षातील सर्वात मोठ्या ओपनिंगपैकी एक ठरू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Comments are closed.