Dhurandhar – दिवाळीला अवतरणार ‘धुरंधर’? रणवीर सिंहच्या टीमचा काय आहे मास्टर प्लॅन, वाचा

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह नेहमीच त्याच्या फॅशनसेन्स आणि नव्या लूकसाठी चर्चेत असतो. सध्या रणवीरचा आगामी चित्रपट ‘धुरंधर’चा फस्ट लूक चर्चेचा विषय ठरतोय. रणवीरने त्याच्या वाढदिवशी या चित्रपटाचा फस्ट लूक शेअर केला होता. तेव्हापासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत होते. दरम्यान आता दिवाळीदरम्यान या चित्रपटाची तारीख जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आदित्य धर दिग्दर्शित “धुरंधर” या चित्रपटामध्ये अभिनेता संजय दत्त, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल यांच्याही मुख्य भूमिका आहेत. दरम्यान 15 ऑक्टोबरपर्यंत या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होईल असा विश्वास निर्मात्यांनी दर्शवला आहे.
रणवीरच्या “धुरंधर” या चित्रपटाची टीम दिवाळीच्या निमित्ताने त्यांचे पहिले गाणे लाँच करणार असल्याचेही समोर आले आहे. “धुरंधर” च्या या पहिल्याच गाण्यात चित्रपटातील सगळे कलाकार एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे या गाण्यांची आणि चित्रपट प्रदर्शित होण्याची सगळ्यांना उत्सुकला लागली आहे.
थिएटरमध्ये प्रदर्शित होणार ट्रेलर
“धुरंधर” हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चित्रपटाचा ट्रेलर हा नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होऊ शकतो. या चित्रपटाची खासियत म्हणजे या चित्रपटाचा ट्रेलर हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा आहेत.
Comments are closed.