दिल्लीत एका न्यायाधीशाने आत्महत्या केली का?

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

अमन कुमार शर्मा नामक एका 30 वर्षांच्या न्यायाधीशाचा मृत्यू झाला असून त्याने आत्महत्या केली असावी, असे प्राथमिक अनुमान आहे. मात्र, ही आत्महत्याच आहे काय, यासंबंधी निश्चित माहिती आतापर्यंत देण्यात आलेली नाही. या न्यायाधीशाचा मृतदेह त्याच्या घरातील खोलीत फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. डीएसएसचे सचिव म्हणून त्यांनी नियुक्ती नुकतीच दिल्लीच्या कडकडदुमा न्यायालयात करण्यात आली होती. ही घटना सफदरजंग पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत घडली आहे. दिवंगत न्यायाधीशाचा मेहुणा शिवम शर्मा याने पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पुढच्या अन्वेषणाला प्रारंभ करण्यात आला आहे. अमन कुमार शर्मा यांनी महाराष्ट्रातील पुणे येथील सिंबॉयसिस विद्यापीठातून बीए एएलबीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. एक बुद्धीमान विद्यार्थी म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांच्या गूढ मृत्यूमुळे साऱ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. या घटनेच्या चौकशीचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या पोलीस चौकशी करीत आहेत.

Comments are closed.