सूर्यकुमार यादवला स्वतंत्रपणे किती बक्षीस मिळालं? जाणून घ्या टी-20 वर्ल्ड कपमधून भारतीय कर्णधाराची एकूण कमाई

टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफी सर्वाधिक वेळा जिंकण्याचा विश्वविक्रम आता भारताच्या नावावर आहे. 8 मार्च रोजी भारतीय संघाने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत विश्वविजेतेपदावर नाव कोरले. 2026 (Icc T20 international world cup 2026) चा हा वर्ल्ड कप भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली जिंकला आहे. सूर्यकुमारने कर्णधार म्हणून तर इतिहास रचलाच, पण त्याची वैयक्तिक कामगिरी देखील उत्तम राहिली.

कर्णधार सूर्यकुमार यादवने या वर्ल्ड कपमधील 9 डावांत 242 धावा केल्या, ज्यात त्याची 84 धावांची खेळी सर्वोत्तम ठरली. या कामगिरीसाठी सूर्यकुमारला वेगळे बक्षीस (Prize Money) मिळाले आहे का आणि या वर्ल्ड कपमधून त्याची किती कमाई झाली, असा प्रश्न विचारला जात आहे.

टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला वेगळे कोणतेही बक्षीस किंवा रोख रक्कम मिळालेली नाही. भारतीय संघाला एकूण 27.48 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. रिपोर्ट्सनुसार, ही रक्कम खेळाडू, प्रशिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये वाटली जाते. कर्णधार सूर्यकुमारला या बक्षीस रकमेतील ठराविक हिस्सा आणि मॅच फी (Match Fee) मिळाली आहे, त्याला वैयक्तिकरित्या कोणतेही अतिरिक्त बक्षीस मिळालेले नाही.

दुसरीकडे, ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरलेल्या संजू सॅमसनला मात्र 21 लाख रुपयांचे विशेष बक्षीस मिळाले आहे. सॅमसनने 2026 च्या वर्ल्ड कपमध्ये पाच डावांत 321 धावा केल्या होत्या, ज्यात सलग 3 अर्धशतकांचा समावेश होता. तसेच, फायनलमध्ये ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरलेल्या जसप्रीत बुमराहला 8.4 लाख रुपये वेगळे मिळाले आहेत. बुमराह आणि संजू सॅमसन यांच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही खेळाडूला अतिरिक्त बक्षीस रक्कम मिळालेली नाही.

Comments are closed.