“भारताविरुद्ध जिंकण्यासाठी मोहम्मद रिझवानचा टोटक्याचा प्रयत्न? माळ घेऊन प्रार्थना करूनही पराभव!”

रविवारी (23 फेब्रुवारी) रोजी भारत आणि पाकिस्तान या दोन संघात सामना खेळला गेला. भारतीय संघाने एकतर्फी सामन्यात पाकिस्तानचा 6 विकेट्सनी पराभव केला. दरम्यान, पाकिस्तान संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवानने संघाला विजय मिळवून देण्यासाठी वापरलेली युक्तीही कामी आली नाही. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात रिझवान हातात तस्बीह घेऊन बसलेला दिसत होता. तस्बीह ही मुस्लिम धर्माशी संबंधित एक पवित्र जपमाळ आहे जी सामान्यतः मुस्लिम धार्मिक गुरुंच्या हातात पाहिली जाते.

पाकिस्तान संघाचा कर्णधार रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बाबर आझम आणि इमाम उल हक ही जोडी ओपनिंगसाठी मैदानात आली. त्याचदरम्यान, रिझवान ड्रेसिंग रूममध्ये तस्बीह घेऊन बसलेला दिसून आला. त्यानंतर समालोचक आकाश चोप्रा म्हणतात की रिझवान काहीतरी करत आहे. त्याने विचारले की त्याच्या हाताचा काय आहे? यावर समालोचक आणि माजी पाकिस्तानी खेळाडू वहाब रियाज यांनी उत्तर दिले. तो म्हणाला की ही तस्बीह आहे. रियाजने तस्बीहचे धार्मिक महत्त्व पुढे स्पष्ट केले. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने भारतीय संघासमोर 242 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष्य केवळ 42.3 षटकांत पूर्ण केले. यादरम्यान विराट कोहलीने जोरदार नाबाद शतकी खेळी केली. कोहलीने 111 चेंडूत 7 चौकारांसह 100 धावा केल्या. कोहलीने सुरुवातीपासूनच पाकिस्तानी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. कोहली सतत एकेरी आणि दुहेरी मारून क्षेत्ररक्षकांवर दबाव आणत होता. या जबरदस्त फलंदाजीला कोणत्याही गोलंदाजाकडे उत्तर नव्हते. यादरम्यान कोहलीने चौकार मारून शतक पूर्ण केले आणि टीम इंडियाचा विजयही निश्चित केला.

महत्वाच्या बातम्या:

विराट कोहली झिंदाबाद! भारताच्या विजयानंतर जावेद अख्तर का झाले ट्रोल?

22 पंडित आणि जादूटोण्याने पाकिस्तानचा पराभव? भारतावर आरोप करत, पाक मीडियाच्या हास्यास्पद दावा

चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये पाकिस्तानविरूद्ध शतक ठोकणारे 4 फलंदाज! ‘किंग’ कोहलीचाही समावेश

Comments are closed.