Asia Cup: भारत- पाक सामन्यापूर्वी पाकिस्तान संघ हतबल? पाकिस्तानच्या पराभवाविषयी माजी खेळाडू नेमकं काय म्हणाला?
भारताने आशिया कप 2025 मध्ये विजयासह आपल्या स्पर्धेला सुरुवात केली आहे. 10 सप्टेंबर रोजी UAE विरुद्ध सामन्यात टीम इंडियाने 9 विकेट्सने मोठा विजय मिळवला. आता आशिया कपमध्ये भारताची पुढील टक्कर पाकिस्तानसोबत होणार आहे. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील आकडेवारीवर नजर टाकली तर टीम इंडियाच पारडं जड आहे. पण प्रत्येक देशाला आपल्या टीमकडून विजयाची आशा असते. मात्र पाकिस्तानसोबत असे दिसत नाही. संघाच्या माजी कर्णधाराने सामन्यापूर्वी असे विधान केले की, असं वाटतं की त्यांनी पाकिस्तानची हार आधीच मान्य केली आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार राशिद लतीफ (Rashid Latif) यांनी भारत-पाकिस्तान सामन्याबाबत पीटीआयशी बोलताना सांगितले, आपण भावनिक आणि खूप उत्साही होतो आणि सर्व काही एकाच वेळेस करायचा प्रयत्न करतो. राशिद लतीफ यांनी पुढे सांगितले, भारतविरुद्ध सामना आपण योग्यरित्या हाताळू शकत नाही आणि म्हणूनच पाकिस्तान सामन्यात हरतो. तर भारतीय संघ नेहमी खेळपट्टी आणि सामन्याच्या परिस्थितीनुसार खेळतो, त्यामुळे भारत जिंकतो. माजी पाक कर्णधारांनी असेही सांगितले की, पाकिस्तानवर मागील 30 वर्षांपासून दबाव आहे आणि भारत या आशिया कपमध्ये याचा पूर्ण फायदा घेऊ शकतो.
माजी पाकिस्तानी क्रिकेटर राशिद लतीफ यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंची प्रशंसा करत सांगितले, हार्दिक पांड्या (Hardik pandya) खूपच धोकादायक खेळाडू आहे. मधल्या फळीत किंवा शेवटी येणारे खेळाडू सामन्याची दिशा पूर्णपणे बदलू शकतात. पांड्याने हे एकदाच नव्हे, तर अनेकदा केले आहे, म्हणून त्याला एक्स-फॅक्टर देखील म्हटले जाते.
Comments are closed.