Diet Tips : डाएटिंगदरम्यान गोड खाण्यावर असा ठेवा कंट्रोल
वजन कमी करणे हे काही सोपे काम नाही. यासाठी तुमचा आहार आणि व्यायाम नियंत्रित करणे खूप महत्वाचे आहे. पण या काळात काहीतरी खाण्याची तीव्र इच्छा होत असते. ज्या लोकांना गोड पदार्थ खूप खायला आवडतात, त्यांना नेहमीच चॉकलेट, मिठाई किंवा कोणताही गोड पदार्थ खाण्याची इच्छा असते. पण गोड पदार्थ खाल्ल्याने वजन वाढू शकते. म्हणून, तज्ञांनी सांगितलेल्या मर्यादेतच गोड पदार्थांचे सेवन करायला हवे. गोड पदार्थ खाण्यावर आपला संयम असायला हवा कारण यामुळे लठ्ठपणा व्यतिरिक्त, मधुमेह आणि इतर अनेक समस्या देखील उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत, वजन घटवण्याच्या काळात सर्वात मोठे आव्हान असते ते म्हणजे गोड खाण्याची इच्छा नियंत्रित करणे. तुम्ही कितीही दृढनिश्चयी असलात तरी, अचानक तुमच्या समोर चॉकलेट, मिठाई सारखे पदार्थ येतात तेव्हा स्वतःला रोखणे कठीण होते. जर तुमच्यासोबतही असे घडत असेल, तर तुम्ही गोड खाण्याची इच्छा नियंत्रित करू शकता.
निरोगी पर्याय
जर तुम्हाला काहीतरी गोड खावेसे वाटत असेल तर तुम्ही हेल्दी ऑप्शन निवडू शकता. तुम्ही डार्क चॉकलेट खाऊ शकता. सफरचंद, केळी, पपई, बेरी यासारखी फळे आपल्या शरीराला नैसर्गिक साखर तसेच फायबर देतात. तुम्ही गूळ, मनुका आणि खजूर यासारखे काही पदार्थही खाऊ शकता. पण मर्यादित किंवा कमी प्रमाणात.
थोडे खा
जर तुम्ही साखर पूर्णपणे बंद केली तर त्याचा उलट परिणाम होऊ शकतो आणि तुम्ही एका दिवसात जास्त गोड पदार्थ खाण्याची शक्यता असते. म्हणूनच आठवड्यातून एकदा चीट मील घेणे महत्वाचे आहे जेणेकरून तुम्हालाही बरे वाटेल आणि आहारातही संतुलन राखले जाईल.
गोड पदार्थ हळूहळू कमी करा
जर तुमचे वजन कमी व्हायला सुरुवात झाली असेल तर गोड पदार्थ खाणे पूर्णपणे थांबवू नका. त्याऐवजी, साखर हळूहळू कमी करा, जसे की जर तुम्ही जास्त साखरेचा चहा प्यायलात तर तो हळूहळू कमी करा. पण गोड पदार्थ खाणे पूर्णत: लगेच सोडू नका.
हेल्दी लाइफस्टाईलचा स्वीकार करा
याव्यतिरिक्त ताणतणाव देखील आपली भूक वाढवू शकतो. म्हणून, ताण कमी करण्यासाठी, योगासने करा, ध्यान करा, चाला किंवा धावा, म्हणजेच स्वतःला शारीरिकदृष्ट्या सक्रिय ठेवा. यासोबतच पुरेशी झोप घ्या आणि निरोगी आहार घ्या. जर तुम्हाला दररोज गोड पदार्थ खाण्याची इच्छा असेल, तर तुमच्या आहारतज्ञ किंवा तज्ञांशी बोलल्यानंतर तुम्ही तुमच्या आहारात गोड पदार्थांचे हेल्दी पर्याय समाविष्ट करू शकता.
हेही वाचा : Raw Mango : उन्हाळ्यात आंबट-गोड कैरी का खावी?
संपादित – तनवी गुडे
Comments are closed.