निष्ठावंत सोडून वेगळा निर्णयही होऊ शकतो; राम शिंदेंच्या विधानाने अहिल्यानगर भाजपमध्ये खळबळ, तनप
अहिल्यानगर : अहिल्यानगर विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपला अनुकूल वातावरण आहे, त्यामुळे ही जागा भाजपला मिळावी असा आमचा आग्रह आहे. मात्र याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. आमच्याकडे तोलामोलाचे इच्छुक उमेदवार देखील आहेत, मात्र याबाबत मुख्यमंत्री आणि आमची कोर कमिटी निर्णय घेईल, “निष्ठावंत तीन-चार उमेदवार आहेत, मात्र वेगळाही निर्णय होऊ शकतो” असे सूचक वक्तव्य विधान परिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांनी केले आहेत. वेगळा निर्णय म्हणजे काय असे विचारले असता कोर कमिटी ठरवेल तो निर्णय होईल असं राम शिंदे (Ram Shinde) म्हणाले. एकीकडे राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू असताना राम शिंदे (Ram Shinde) यांनी “वेगळा ही निर्णय होऊ शकतो असं म्हंटल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.(Ram Shinde)
Ram Shinde : राम शिंदे प्राजक्त तनपुरेंबाबत बोलताना म्हणावे….
राम शिंदे यांच्या “वेगळा निर्णय होऊ शकतो” याबाबत विचारत वेगळा निर्णय म्हणजे प्राजक्त तनपुरे का? असं विचारलं असता अद्यापतरी प्राजक्त तनपुरे आणि भाजपचा काही संबंध नाही मात्र त्यांनी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द ऐकला आणि उमेदवारी दिली नाही हे सत्य आहे, त्यांचा निर्णय काय होतो हे लवकर कळेल असं राम शिंदे यांनी म्हटलं आहे.
Ram Shinde : राम शिंदेंनी रोहित पवारांना डिवचलं
शरद पवार भाजपत गेले तरी मी भाजपच जाणार नाही असे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार म्हणतात आता “आज्याला नातू काय शिकवणार”, ते पवार साहेबांना ही मानणार नाहीत. रोहित पवारांची उंची दिवसेंदिवस वाढत चालली आहे, ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेते झालेत असा उपरोधीक टोला विधानसभा परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी रोहित पवारांना लगावला आहे. “मला एक इंटरनॅशनल कॉल आला , ट्रम्प, पुतीन, किम जॉन यांची वरिष्ठ ठिकाणी बैठक झाली. एवढा मोठं नेतृत्व(रोहित पवार) हे पवार साहेबांच ऐकत नाही, शरद पवारांना चॅलेंज म्हणजे मोठी गोष्ट असं म्हणत एक शिष्टमंडळ भारताकडे निघालंय” असा टीका राम शिंदे यांनी रोहित पवारांना उद्देशून केली आहे.सोबतच शरद पवार खरंच भाजपात जाणार का? हे रोहित पवारांना विचारलं पाहिजे असंही राम शिंदे म्हणाले.
Ram Shinde : प्राजक्त तनपुरेंच्या प्रवेशाची तारीख फिक्स
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे. त्यातच अहिल्यानगरची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषदेची उमेदवारी भाजपकडून तनपुरे (Prajakt Tanpure) यांना मिळणार असल्याची चर्चा सुरू असताना भाजपचे देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी मात्र विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. सत्यजित कदम हे भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे चिरंजीव आहेत.
प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. तनपुरेंना अहिल्यानगरच्या जागेवरुन उमेदवारी जाहीर होणार असल्याची माहिती आहे. तनपुरे यांचा ३० मे रोजी भाजप प्रवेश निश्चित झाला असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. राहुरी पोटनिवडणुकीवेळी अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीवेळी तनपुरे यांनी माघार घेतली होती. प्राजक्त तनपुरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. तसेच नगरमधील ते मोठे नेते आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात होते. आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. (Prajakt Tanpure)
आणखी वाचा
Comments are closed.