पचनशक्ती कायम मजबूत आणि निरोगी राहील! नाश्त्यात बनवा स्वादिष्ट मुळा पराठा, पोट साफ होईल

हिवाळ्यात अनेक प्रकारच्या पालेभाज्या बाजारात उपलब्ध असतात. पालेभाज्या खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. रोजच्या आहारात मुळ्याच्या भाज्यांचे सेवन करा. मुळ्याच्या भाजीची चव काहीशी तिखट असते. शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी मुळ्याच्या भाजीचे सेवन करावे. या भाजीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फोलेट, व्हिटॅमिन बी6, फॉस्फरस, अँटीऑक्सिडंट्स आणि भरपूर पाणी असते. पचनाच्या समस्यांनी त्रस्त असलेल्यांनी आठवड्यातून दोनदा पालेभाज्या किंवा मुळ्याच्या भाज्यांचे सेवन करावे. या भाजीचे सेवन केल्याने आतड्यांमध्ये साचलेली घाण काढून टाकण्यासाठी मुळा खूप गुणकारी ठरतो. यामुळे शरीर स्वच्छ होते. आज आम्ही तुम्हाला नाश्त्यासाठी मुळा पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मुळा पराठ्याची चव खूप छान लागते. जेव्हा तुम्हाला घाई असेल तेव्हा तुम्ही झटपट मुळ्याच्या भाजीचे पराठे बनवू शकता. मुळा खाल्ल्याने शरीरही हायड्रेट राहते. चला तर मग जाणून घेऊया मुळा पराठ्याची सोपी रेसिपी.(छायाचित्र सौजन्य – पिंटरेस्ट)

तुम्हाला गोड काहीतरी हवे असेल तर घरीच बनवा कॅफे स्टाईल चॉकलेट ब्राउनी सोप्या पद्धतीने, रेसिपी लक्षात ठेवा

साहित्य:

  • मुळा
  • हिरव्या मिरच्या
  • तेल
  • गव्हाचे पीठ
  • लाल मिरची
  • कोथिंबीर
  • मीठ
  • धणे पूड
  • जिरे पावडर
  • हळद

सकाळचा पौष्टिक आणि चविष्ट नाश्ता करा, यंदा घरीच खा 'पालक चिला'; फक्त 10 मिनिटांत एक रेसिपी

कृती:

  • मुळा पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका प्लेटमध्ये गव्हाचे पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ आणि तेल घालून चांगले मिक्स करावे.
  • नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या.
  • एका मोठ्या भांड्यात किसलेला मुळा, लाल मिरच्या, चवीनुसार मीठ, हळद, धने जिरेपूड, बारीक चिरलेला कांदा, चाट मसाला घालून मिक्स करा.
  • गव्हाच्या पिठाचे छोटे गोळे करून त्याची परी बनवा. त्यात मुळ्याचे मिश्रण भरून हलक्या हाताने पराठा लाटून घ्या.
  • लाटलेला पराठा भाजण्यासाठी तव्यावर ठेवा आणि दोन्ही बाजूंनी चांगला भाजून झाल्यावर तुपाने घासून घ्या.
  • साध्या पद्धतीने बनवलेला मुळा खमंग पराठा तयार आहे. ही डिश दही किंवा सॉससोबत खूप छान लागते.

Comments are closed.